शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी येथे आराम बसवर कारवाई; एक प्रवासी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 17:10 IST

CoronaVirus Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात गुरूवारी सकाळी ६ वाजता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या एका खासगी बसवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या २९ जणांची आरोग्य विभागाच्या पथकाने तत्काळ अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळली आहे.

ठळक मुद्देकशेडी येथे आराम बसवर कारवाईएक प्रवासी पॉझिटिव्ह

खेड : रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात गुरूवारी सकाळी ६ वाजता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या एका खासगी बसवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या २९ जणांची आरोग्य विभागाच्या पथकाने तत्काळ अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळली आहे.जिल्ह्यात गुरूवारपासून कडक लॉकडऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी घेऊन जिल्ह्यात येणाऱ्यानाच दिनांक २ रोजीपासून प्रवेश देण्यात येत आहे.मात्र, गुरुवारी सकाळी ६ वाजता कशेडी घाटात पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना खासगी आराम बस (एमएच ०३, सिव्ही ३१५०) थांबवली असता चालकाकडे व प्रवाशांकडे कोणतीही परवानगी नव्हती.पोलिसांनी चालकासह प्रवाशांची आरोग्य विभागाच्या फिरत्या पथकाद्वारे महाड नाका येथील एस. टी. च्या मैदानात अँटिजन चाचणी केली. या बसमधून प्रवास करणारा एक प्रवासी कोरोनाबाधित आढळला. या प्रवाशाला तातडीने शिवतेज संस्थेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा प्रवासी संगमेश्वर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.बसमधून प्रवास करणाऱ्या अन्य २८ जणांची तालुका प्रशासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पुढील प्रवासाची व्यवस्था केली आहे. या सर्व प्रवाशांची दिशाभूल करून त्यांना जिल्ह्याच्या हद्दीत घेऊन येणाऱ्या बसचालक व मालक यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया खेड पोलीस स्थानकात सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTrafficवाहतूक कोंडीKhedखेडRatnagiriरत्नागिरी