शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला चावून पळालेला आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 17:13 IST

Crimenews Ratnagiri police- तुरुंगातून नुकताच सुटलेला आरोपी संशयितरित्या फिरताना दिसल्याने गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसाच्या हाताला चावा घेऊन पळण्यात यशस्वी झालेल्या आरोपीला १४ दिवसांत पुन्हा पकडण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. हेमंत पांडुरंग देसाई (२९, रा. कांदिवली, मुंबई) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून, ही घटना १९ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली होती.

ठळक मुद्देपोलिसाला चावून पळालेला आरोपी गजाआडरत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांची कारवाई

रत्नागिरी : तुरुंगातून नुकताच सुटलेला आरोपी संशयितरित्या फिरताना दिसल्याने गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसाच्या हाताला चावा घेऊन पळण्यात यशस्वी झालेल्या आरोपीला १४ दिवसांत पुन्हा पकडण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. हेमंत पांडुरंग देसाई (२९, रा. कांदिवली, मुंबई) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून, ही घटना १९ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली होती.रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत पोलीस अंमलदार प्रवीण कृष्णा खांबे हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत गस्त घालत होते. त्याचवेळी सन्मित्रनगर ते उद्यमनगर रस्त्यावरील ओसवालनगर येथे नुकताच तुरंगातून सुटलेला आरोपी हेमंत देसाई संशयितरीत्या दिसला. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसाच्या डोक्यावर दगड मारला. मात्र, प्रसंगावधान राहून तो दगड त्यांनी चुकविला.

त्याचवेळी तो पळून जाऊ नये यासाठी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हेमंतने प्रवीण खांबे यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर चावा घेऊन पोलिसांचीच दुचाकी चोरून पळाला होता. याबाबत शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे खास पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हेमंत देसाई ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील खेडशी येथे तो येणार असल्याची माहिती मिळाली.

रेल्वे स्थानक ते हातखंबा मार्गावर गस्त घालत असताना खेडशी येथील चाँदसूर्या येथे हेमंत देसाई याला पकडण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पोलीस उपनिरीक्षक विनायक नरवणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद कदम, आशिष शेलार, पोलीस नाईक बाळू पालकर, रमिज शेख, अमोल भोसले, सत्यजित दरेकर, चालक दत्तात्रय कांबळे यांनी ही कामगिरी केली.आतापर्यंत १६ गुन्हे दाखल असलेला संशयितहेमंत देसाई हा मूळचा देऊड (ता. रत्नागिरी) येथील राहणारा आहे. त्यामुळे त्याचे मूळ गावी येणे जाणे असते. त्याच्यावर यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात चोरीचे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. तसेच मुंबई परिसरात खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी व सरकारी कामात अडथळा यासारखे ११ गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी