शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या अपहरणप्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

By admin | Updated: June 24, 2016 01:11 IST

रत्नागिरीतील प्रकार : सामाजिक संस्थांची जागरूकता

रत्नागिरी : अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला वाम मार्गाला लावणाऱ्या संदीप प्रकाश यादव याला मुख्य न्यायदंडाधिकारी बी. डी. कुलकर्णी यांनी दोन वर्ष सक्तमजुरी व ४ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्याचबरोबर बाल न्याय कायदा व संरक्षण अधिनियमानुसार ४ महिने सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंड अशी शिक्षाही त्याला सुनावण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड येथील एका आठ वर्षाच्या मुलाला त्याचे मद्यपी वडील रोज मारहाण करत असत. या रोजरोजच्या मारहाणीला कंटाळलेल्या या मुलाने घरातून पळ काढत मुंबई गाठली. त्यावेळी संदीप प्रकाश यादव (रा. चापोली सरोदयवाडी देवरुख) याला तो सापडला. संदीपने त्या मुलाला आईवडिलांकडे सोडतो, असे सांगून मुंबईतून थेट रत्नागिरीत आणले. रत्नागिरीत रेल्वे स्टेशन येथे आणून त्याला मारहाण करून नशा करण्यासाठी जबरदस्ती केली. संदीप त्याला मारहाण करून भीक मागण्यासाठी प्रवृत्त करत होता.
एक दिवस चाईल्ड लाईन संस्थेच्या समन्वयक प्राची प्रकाश जाधव यांना हा मुलगा दिसला. त्यांनी याबाबतची माहिती बाल संरक्षण अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांना दिली. त्यानुसार त्यांनी संदीप यादव याच्याविरोधात शहर पोलिस स्थानकात २६ आॅक्टोबर २०१५ला अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक चित्रा मढवी करत होत्या. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. सर्व पुरावे ग्राह्य मानून मुख्य न्यायदंडाधिकारी बी. डी. कुलकर्णी यांनी संदीपला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. एस. ए. फर्नांडिस यांनी काम पाहिले. (वार्ताहर)