शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या तिजोरीत १० कोटींची भर

By admin | Updated: September 27, 2015 00:45 IST

गौण खनिज वसुली : वसुलीमध्ये मंडणगड तालुका अव्वल

रत्नागिरी : गौण खनिज बंदी उठवण्यात आल्याने जिल्ह्याच्या महसूलातही वाढ झाली आहे. खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील गौण खनिज वसुलीपोटी आॅगस्टअखेर तब्बल १० कोटी ४७ लाख इतकी वसुली करून जिल्ह्याच्या तिजोरीत भर टाकली आहे. जिल्हा खनिकर्म विभागाला गौण खनिज वसुली, शासकीय वसुली आणि थकबाकी, चालू दंड, अर्ज फी व भूपृष्ठ भाडे आदींपोटी जिल्ह्यासाठी एकूण ३६ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पाच उपविभाग आणि तहसील स्तरावरही उद्दिष्ट देण्यात आल्याने जिल्ह्यासाठी यावर्षी ४६ कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचा मानस जिल्हा कार्यालयाने ठेवला आहे. एप्रिल ते आॅगस्ट २०१५ या पाच महिन्यात दिलेल्या उद्दिष्टापैकी केलेल्या वसुलीत मंडणगड तालुक्याने अव्वल स्थान राखले आहे. (५३ लाख १८ हजार रूपये), त्याखालोखाल वसुली खेड तालुक्याची झाली आहे. सर्वात कमी वसुली राजापूर (७ लाख २२ हजार), संगमेश्वर (१४ लाख २५ हजार), लांजा (१४ लाख १९ हजार) इतकी झाली आहे. उपविभागात राजापूरने बाजी मारली असून, १ कोटी ६४ लाखांची वसुली केली आहे. त्याखालोखाल खेड उपविभागाची वसुली ४६ लाख रूपये इतकी झाली आहे. गौण खनिजांवरील बंदी उठल्यानंतर सर्वच तालुक्यांनी जोर लावलेला दिसून येत आहे. जिल्ह्यातील राजापूर, चिपळूण, रत्नागिरी, खेड, दापोली या पाच उपविभागांनी तसेच नऊ तहसील कार्यालयांनी मिळून आॅगस्टअखेर एकूण १० कोटी ४६ लाख ९८ हजार इतकी वसुली केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही धडक कामगिरी करत आॅगस्टअखेर ४ कोटी ४६ लाख ५४ हजार एवढी वसुली केली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास सात महिने शिल्लक असल्याने या कालावधीत उद्दिष्टापेक्षाही अधिक वसुली करण्याचा निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)