बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 08:55 IST2024-05-21T08:55:28+5:302024-05-21T08:55:54+5:30

राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात गेल्या वर्षी २ ऑगस्ट राेजी ही संतापजनक घटना घडली हाेती. कालू आणि कान्हा अशी घटनेतील दाेषींची नावे आहेत. १४ वर्षीय पीडित मुलगी शेळ्या चारण्यासाठी गेली हाेती.

Burned alive after rape, two sentenced to death | बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी

बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी

जयपूर : एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची जिवंत जाळून हत्या केल्याप्रकरणी दाेन जणांना पाेक्साे न्यायालयाने फाशीची शिक्षा ठाेठाविली आहे. मुलीला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया तिच्या आईवडिलांनी दिली.

राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात गेल्या वर्षी २ ऑगस्ट राेजी ही संतापजनक घटना घडली हाेती. कालू आणि कान्हा अशी घटनेतील दाेषींची नावे आहेत. १४ वर्षीय पीडित मुलगी शेळ्या चारण्यासाठी गेली हाेती. आराेपींनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला प्रचंड मारहाण करण्यात आली. आराेपी एवढ्यावरच थांबले नाही, तर तिला काेळशाच्या भट्टीत जिवंत जाळून मारले. पाेलिसांनी जवळपास राहणारे कालू आणि कान्हा यांना अटक केली हाेती.  

बलात्कारानंतर तिचा मृत्यू झाल्याचे वाटल्याने तिला भट्टीत फेकले, असे आराेपींनी सांगितले. मात्र, फाॅरेन्सिक अहवालात तिचा मृत्यू जळाल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. 
 

Web Title: Burned alive after rape, two sentenced to death