शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

...अन् भारतातला विवाह झाला अमेरिकेत, कुटुंबाची ऑनलाईन उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 20:20 IST

Neral : परदेशात असलेल्या वधू आणि वर या दोघांचे भारतात लग्न ठरले होते. मात्र कोरोनाने त्यांची वाट अडविल्याने त्यांनी अमेरिकेतच लग्न केले आहे. तर या लग्नाला घरातील मंडळी हि ऑनलाईन उपस्थित होती.

ठळक मुद्देअजय एनव्हिडिया व श्रीनिधी मायक्रोसॉफ्ट या प्रसिद्ध कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.

- कांता हाबळे

नेरळ : कोरोनाने असे नी तसे सर्व बाजूनी सर्वसामान्याना जेरीस आणले आहे. अनेक लग्न खोळंबली आहेत. तर काहींनी बँड, बाजा, बारात नको म्हणत मोजक्याच घरच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत उरकून घेतली आहे. अशात कर्जत तालुक्यातील एका नवरदेवाची विवाह स्टोरी समोर आली आहे. परदेशात असलेल्या वधू आणि वर या दोघांचे भारतात लग्न ठरले होते. मात्र कोरोनाने त्यांची वाट अडविल्याने त्यांनी अमेरिकेतच लग्न केले आहे. तर या लग्नाला घरातील मंडळी हि ऑनलाईन उपस्थित होती.  

कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील रहिवासी असलेले व मुंबई येथे पोलिस निरीक्षक पदावर रुजु असलेले अनिल शंकर थोरवे ह्यांचा मुलगा अजय अनिल थोरवे आणि त्याची भारतातील केरळ येथील वर्ग मैत्रीण श्रीनिधी श्रीनिवास राघवन यांचे लग्न ठरले होते. अजय व श्रीनिधी या दोघांनी मुंबई युनिव्हर्सिटी मधून कम्प्युटर इंजिनीअरिंग केलेले असून अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. 

अजय एनव्हिडिया व श्रीनिधी मायक्रोसॉफ्ट या प्रसिद्ध कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. अजय आणि श्रीनिधी यांचं लग्न सुमारे दीड वर्षांपासून प्रलंबित होतं. कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर २ एप्रिल २०२० रोजी मुंबईमध्ये लग्न करण्याचे ठरले होते. त्यासाठी हॉटेल देखील बुक केले होते.  मात्र कोरोनामुळे अमेरिकेहून विमानांची वाहतूक बंद झाल्याने त्यांचे लग्न १७ मे रोजी मुंबईत करण्याचे ठरले होते. परंतु  यावेळी देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विवाह सोहळ्याच्या दुस-या नियोजनावर पाणी फिरवले. 

कोरोनाने वाट अडविल्याने दोघांना भारतात यायला जमले नाही. म्हणुन दोघांच्या कुटुंबियांनी त्यांचे लग्न अमेरिकेत करण्याचा निर्णय घेतला व भारतातून ऑनलाइन हजेरी लावण्याचे निश्चित केले. त्यानुसार सिॲटल अमेरिका येथे अमेरिकेतील तारखेनुसार दिनांक १६ मे २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजता दोघांच्या सुमारे वीस मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीमध्ये कोर्ट मॅरेज विवाह सोहळा पार पडला. 

दोघांच्याही कुटुंबियांना आनंद झाला असला तरीही त्यांच्या लग्नात प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याची खंत दोघांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. अशाप्रकारे कोरोनाने भारतीय जोडीचे एक लग्न अमेरिकेत करण्यास भाग पाडले.  सध्या दोघेही सिॲटल अमेरिका येथे राहत आहेत.

टॅग्स :Raigadरायगडmarriageलग्न