शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 07:09 IST

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, उरण, पनवेल या चार पारंपरिक जागा शेकापला मिळाव्यात, यासाठी पक्ष सुरुवातीपासूनच आग्रही

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: शेकापने रायगड चार, सोलापूरमधील सांगोला आणि नांदेडमधील लोहा-कंधार या सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार मंगळवारी जाहीर केले. चित्रलेखा पाटील (अलिबाग), अतुल म्हात्रे (पेण), बाळाराम पाटील (पनवेल), प्रीतम म्हात्रे (उरण) आणि बाबासाहेब देशमुख (सांगोला), श्यामसुंदर शिंदे (लोहा-कंधार) हे शेकापचे उमेदवार आहेत.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, उरण, पनवेल या चार पारंपरिक जागा शेकापला मिळाव्यात, यासाठी पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी अलिबाग येथील शेतकरी भवन येथे शक्तिप्रदर्शन करून पाटील यांनी उमेदवारी जाहीर करून रणशिंग फुंकले आहे.

- पारंपरिक मतदारसंघात पुन्हा लालबावटा फडकविणार असल्याचा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवला. तसेच शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीसोबत आहे, असेही स्पष्ट केले.
- शेकापने अलिबागमधून दिवंगत मिनाक्षी पाटील यांच्यानंतर चित्रलेखा पाटील यांच्या रूपाने दुसऱ्या महिला उमेदवाराला संधी दिली आहे.
- विधानसभा उमेदवारी जाहीर करण्यासाठी शेतकरी भवन येथे मंगळवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत  जयंत पाटील शेकापचे उमेदवार जाहीर करणार हे निश्चित होते. त्यामुळे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
- माजी आमदार पंडित पाटील आणि नेते ॲड आस्वाद पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये याबाबत चर्चा होती. 

आम्ही महाविकास आघाडीत असून, आम्ही दिलेला शब्द बदलत नाही. जिल्ह्यातील पारंपरिक मतदारसंघात आमचे पूर्वीपासून प्राबल्य असल्याने या जागा आम्हाला मिळायला हव्यात, याबाबत शरद पवार यांच्याशी बोलणी झाली असून, त्यांनी शब्द दिला आहे. काही जागांवर वाद असला तरी तोडगा निघेल.
- जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४panvel-acपनवेलuran-acउरणthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी