शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

महिला अत्याचाराचे प्रमाण घटले, अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 12:15 AM

महिला अत्याचाराविरोधात आतापर्यंत २५ गुन्हे दाखल झाले असून, यातील सहा गुन्हे सिद्ध झाले आहेत, तर १९ जण सुटले आहेत. जिल्ह्यात २४ टक्के महिला अत्याचाराचे प्रमाण आहे.

ठळक मुद्देरायगड जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यांत महिला अत्याचाराबाबत १३० गुन्हे दाखल झालेमहिला अत्याचाराविरोधात आतापर्यंत २५ गुन्हे दाखल झाले असून, यातील सहा गुन्हे सिद्ध झाले आहेत, तर १९ जण सुटले आहेत. जिल्ह्यात २४ टक्के महिला अत्याचाराचे प्रमाण आहे.

अलिबाग :महिला सुरक्षिततेबाबत शासनस्तरावर विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याने, रायगड जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यांत महिला अत्याचाराबाबत १३० गुन्हे दाखल झाले आहेत, तर दुसरीकडे हुंड्यासाठी बळी गेला असल्याची एकही तक्रार दाखल झालेली नाही. रायगड पोलिसांनी महिला सबलीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याने, महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे. 

महिला अत्याचाराविरोधात आतापर्यंत २५ गुन्हे दाखल झाले असून, यातील सहा गुन्हे सिद्ध झाले आहेत, तर १९ जण सुटले आहेत. जिल्ह्यात २४ टक्के महिला अत्याचाराचे प्रमाण आहे. रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला व मुलींचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र्य कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार रायगड जिल्ह्यातील महिला सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.

१ जानेवारी, २०२० ते १७ ऑक्टोबर, २०२० दरम्यान महिलांसंदर्भात रायगड जिल्ह्यात १३० गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये हुंड्यासाठी छळ, बलात्कार, विनयभंग, छेडछाड होणाऱ्या घटनांमध्ये प्रामुख्याने घट झाल्याचे दिसून येत आहे.

अपहरणाच्या घटनांमध्ये झाली वाढ -प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुली व युवतींचे अपहरण करणे किंवा त्यांना पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

मागील १० महिन्यांत वर्षभरात या प्रकारच्या १० तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुली व युवतींना समुपदेशन करण्याची अधिक गरज आहे.

महिलांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य महिलांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक महिलेची तक्रार नोंदविण्यात येत आहे, तसेच तक्रारींची दखल घेऊन कठोर कारवाईही करण्यात येणार आहे. महिला अत्याचाराविरोधात शालेय विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, तसेच तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांना  पोलिसांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.- अशोक दुधे, जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :WomenमहिलाRaigadरायगडMolestationविनयभंग