शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी २०० कोटी द्या, नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 18:25 IST

Mumbai-Goa highway : पुणे येथील विमानतळावर शनिवारी सकाळी खासदार तटकरे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी तटकरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. गडकरी यांच्या बरोबरची बैठक अतिशय चांगली झाली.

रायगड : मुंबई-गोवा महामार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. तसेच पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील डांबरीकरण पावसामुळे उखडल्याने रस्ता खराब झाला आहे. यावर तोडगा म्हणून पहिल्या टप्प्याचे काँक्रिटीकरण करावे आणि त्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

पुणे येथील विमानतळावर शनिवारी सकाळी खासदार तटकरे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी तटकरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. गडकरी यांच्या बरोबरची बैठक अतिशय चांगली झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत गडकरी यांच्याकडे सकारात्मक भूमिका मांडल्यानेच येत्या ५ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये गडकरी यांनी बैठक बोलविल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. या बैठकीत पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे काँक्रिटीकरण करणे हा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

काँक्रिटीकरण करताना जो रस्ता सुस्थितीत आहे, तो तसाच ठेवावा. खराब झालेला रस्ता आणि अपूर्ण असलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, तसेच यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील कालावधीत सातत्याने पळस्पे-इंदापूर मार्गावर खड्डे पडण्याची समस्या निकाली निघेल आणि कोकणच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

इंदापूर ते परशुराम घाटाकडे जाणारा रस्ता आहे. त्यातील कशेडी घाटातील एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर सुशोभीकरण करावे. लोटे परशुराम एमआयडीसी क्षेत्र मोठे आहे. या ठिकाणी गुणाडे येथे अंडरपास रस्ता करणे गरजेचे आहे. त्यामुळे परिसरातील २५ गावांतील नागरिकांना त्याचा फायदा होणार असल्याने तो करावा, अशीही मागणी तटकरे यांनी केली आहे.

गडकरी म्हणतात, मोबदल्याची रक्कम जास्तइंदापूर ते झाराप या दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनासाठी जमिनीला चार पट मोबदला दिला जात आहे. या मोबदल्याची रक्कम खूप होते. त्याबाबत गडकरी यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. याबाबतही ११ ऑक्टोबर राेजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्वतः मी या बैठकीला उपस्थित असणार आहोत. त्या बैठकीमध्ये भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी