शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूल परिस्थितीवर शेतकऱ्याची मात; फूलशेतीतून शोधली स्वयंरोजगाराची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 22:48 IST

दिवसाकाठी हजार रुपयांचे उत्पन्न; तीन गुंठ्यात लावली १२०० रोपे

- राजीव नेवासेकर बोर्ली-मांडला : मुरुड तालुक्यात दुर्गम अशा भोईघर ग्रामपंचायतीतील काजुवाडी येथील शेतकरी रामदास पांडुरंग पाष्टे यांनी परिस्थितीवर मात करून आपल्या नऊ गुंठे क्षेत्रात फुलांची शेती फुलवून स्वयंरोजगाराची यशस्वी वाट शोधली आहे. अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची, कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. मात्र भोईघर येथील शेतकरी पाष्टे यांनी आपल्या लहानशा जमिनीवर फूलशेती करून शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.तालुक्यातील भोईघरमध्ये पाष्टे यांनी फणसाड धरणाच्या जवळ काजुवाडीतील आपल्या शेतातील नऊ गुंठे क्षेत्रातील तीन गुंठ्यांत शेवंतीची, तर तीन गुंठ्यांत झेंडूच्या (गोंड्याची) फुलांची व तीन गुंठे जमिनीत मका पिकवला आहे. २०१६ मध्ये अलिबाग-वाडगाव येथील नातेवाईक महादेव पाष्टे यांच्याकडून शेवंतीची तीनशे रोपे आणून लावली होती. २०१७ मध्ये केवळ एक गुंठ्यात रोपे लावली. यंदा याच ठिकाणी रोपे तयार करून आॅगस्ट महिन्यात तीन गुंठ्यांत १२०० रोपे लावण्यात आली. पाऊस लांबल्याने उशिरा लागवड करूनही पाष्टे यांना चांगले उत्पादन मिळाले आहे. त्यांनी तीन गुंठे जागेत शेवंतीची व तीन गुंठे जागेत झेंडूची (गोंड्याची) रोपे लावली. उरलेल्या तीन गुंठे जागेत मक्याचे पीक, तर अर्ध्या गुंठ्यात पांढरा कांदा (उल) लावली आहे. आता संपूर्ण शेती बहरली असून दोन महिन्यांनंतर दिवसाकाठी हजाराचा रोजगार मिळत आहे.बागायतदार शेतकºयांनी आपल्या बागायतीत नारळ, सुपारी, आंबा पिकाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात फुले, कांदा, मका व रताळी लागवड करून अंतर्गत पीक घेतल्यास स्वयंरोजगाराची वाट खुली होऊ शकते, असा विश्वास रामदास पाष्टे यांनी या वेळी व्यक्त केला.सेंद्रीय खतांचा वापरशेतात फुलांचे व कांद्याचे पीक घेताना, रासायनिक खतांचा वापर न करता यासाठी शेतातच ६ बाय १०चा खड्डा तयार करून त्यात पालापाचोळा व शेणाचा वापर करून सेंद्रीय खत तयार केले. परिणामी दोन महिन्यांनंतर फुलांच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळू लागले असून, वेगळा अनुभव आणि स्वयंरोजगाराची आगळी वाट मिळाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी