शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खालापुरात आरोग्य यंत्रणेने घेतला गर्भवतीचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 12:00 AM

हाळ आदिवासीवाडीतील ग्रामस्थ संतप्त; वेळेवर डॉक्टर न मिळाल्याने मूल आणि आई दगावली

- अंकुश मोरे वावोशी : खालापूर तालुक्यातील हाळ आदिवासीवाडीतील गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळ आणि आई दोघेही दगावल्याची घटना घडल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गात सर्वसामान्य नागरिकांसाठी डॉक्टरच देवासमान वाटत असताना, देवच देव्हाऱ्यात नसेल, तर काय वेळ येते, याचा अनुभव हाळ आदिवासीवाडीतील रतन वाघमारे यांना आला.रतन यांची सात महिन्यांची गर्भवती मुलगी शांती राहुल वाघमारे हिला रविवारी प्रंचड वेदना सुरू झाल्या. वाडीतील आशा सेविकेच्या मदतीने रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला, परंतु रुग्णवाहिका न मिळाल्याने शांतीला रिक्षातून खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. खालापूर आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याचे उत्तर तिथल्या कर्मचाऱ्यांनी दिले. चौक रुग्णालयात घेऊ न जा, असे खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून सांगण्यात आले. अखेर चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल करेपर्यंत उशीर झाल्याने शांतीचा मृत्यू झाला. हाळ आदिवासीवाडीवर या घटनेने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खालापूर आरोग्य केंद्रात डॉॅक्टर असते, तर वेळेत उपचार मिळून शांतीचा जीव वाचला असता; परंतु कोरोना महामारीतही आरोग्य यंत्रणा बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे.मुलीच्या मृत्यूनंतरही रतन वाघमारे यांच्या अडचणी वाढत होत्या. चौकवरून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हाळवाडीत मृतदेह न्यायला रुग्णवाहिका सहा हजार रुपये मागत होती.अखेरीस जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे मदतीला धावले आणि मोफत रुग्णवाहिका मिळाली. तहसीलदार इरेश चप्पलवार यानी मंगळवारी सकाळी वाघमारे कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. रविवारी संपर्क केला असता तर उपचारासाठी प्रयत्न करता आले असते, असे तहसीलदारांनी सांगितले.आमच्या वाडीतील महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. कोरोना काळातही तालुक्याला डॉक्टर नसतील, तर गरिबांनी जायचे कुठे. याबाबत दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे.- रवींद्र वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य, हाळ आदिवासी वाडी