शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

रायगड जिल्ह्यातील २२ गावांत ‘जल पे चर्चा’ अभियान, सात तालुक्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 1:47 AM

महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (एमव्हीएसटीएफ) ही २०१७ मध्ये सुरू झालेली स्वयंसेवी संस्था असून, महाराष्ट्रात एक हजार आदर्श गाव निर्माण करण्याचे संस्थेचे ध्येय आहे.

रोहा : महाराष्ट्र व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशनने स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या सुविधा पुरवण्यासाठी संशोधनाला अनुसरून काम करणाऱ्या अ‍ॅक्वाक्राफ्टच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील सुधागड, माणगाव, तळे, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या सात तालुक्यांतील २२ गावांत ‘जल पे चर्चा’ या अभियानाला सुरुवात झाली आहे.महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (एमव्हीएसटीएफ) ही २०१७ मध्ये सुरू झालेली स्वयंसेवी संस्था असून, महाराष्ट्रात एक हजार आदर्श गाव निर्माण करण्याचे संस्थेचे ध्येय आहे. कॉपोर्रेट क्षेत्र आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने विकासासाठी केल्या जाणाºया प्रयत्नांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी एमव्हीएसटीएफने राष्ट्रउभारणीच्या या कामासाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक-खासगी भागीदारी निर्माण करण्यासाठी मदत केली आहे. त्याअंतर्गत या अभियानास नुकताच मुंबईत प्रारंभ झाला. या वेळी नीती आयोगाशी संबंधित अटल इनोव्हेशन मिशनचे डायरेक्टर आर. रामानन, स्पर्श गंगा अभियानाच्या प्रमुख आरुषी निशंक, आर. डी. नॅशनल कॉलेजच्या आय. सी. प्राचार्या डॉ. नेहा जगतानी उपस्थित होत्या. हे अभियान जागतिक जलदिनी मार्चमध्ये संपणार आहे.ग्रे वॉटर मॅनेजमेंट व पाणीबचतीच्या इतर उपायांच्या साहाय्याने पाण्याचे नवे स्रोत तयार करणे, त्यांचे संवर्धन करणे आणि जलस्रोतांची वाढ या विषयावर या अभियानाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न एमव्हीएसटीएफ व अ‍ॅक्वाक्राफ्ट करत आहे. त्याचबरोबर जलबचतीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली जाणार आहे. एमव्हीएसटीएफ आणि अ‍ॅक्वाक्राफ्टचे हे अभियान महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यांतील ९८ तालुक्यांमध्ये राबवले जाणार आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील सुधागड, माणगाव, तळे, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या तालुक्यांतील २२ गावांचा समावेश आहे.युवकांचा सहभागया अंतर्गत जिल्हास्तरावर तरुणांना आवडणा-या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्यात जलशक्ती अभियान (जेएसए) या घटकाची माहिती दिली जात आहे. मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलो (सीएमआरडीएफ) आणि जिल्हा एक्झिक्युटिव्ह या विषयावरील त्यांची मते आणि जलशक्ती अभियानांतर्गत (जेएसए) करण्यात आलेली कामे, आव्हाने आणि या अभियानाचा काय फायदा झाला, या गोष्टी सर्वांसमोर मांडणार आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखवण्यात येणार असून, कॉलेजातील विद्यार्थ्यांसाठी मुक्त संवादाच्या कार्यक्रमाबरोबरच प्रश्नमंजूषाही आयोजित करण्यात आल्या आहेत. या अभियानात तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एमव्हीएसटीएफच्या वतीने तरुणांना करण्यात आले आहे.

टॅग्स :Raigadरायगड