शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मांडवा बंदरातील गाळ घोटाळ्याची चौकशी? बंदर मंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 02:07 IST

बंदरातील गाळ काढण्यासाठी सातत्याने कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्याने याबाबत तक्रारीही झाल्या आहेत.

अलिबाग - गेल्या काही वर्षांपासून मांडवा बंदर हे रो-रो सेवेमुळे चांगलेच प्रकाशझोतात आले आहे; परंतु अद्यापही रो-रो सेवा सुरू करण्यात सरकार आणि प्रशासनाला यश आलेले नसताना मांडवा बंदरातील गाळ काढण्यासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. बंदरातील गाळ काढण्यासाठी सातत्याने कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्याने याबाबत तक्रारीही झाल्या आहेत. त्या तक्रारींची सत्यस्थिती पडताळून संबंधितांची चौकशी केली जाणार असल्याचे संकेत बंदर विकासमंत्री तथा मेरीटाइम बोर्डाचे अध्यक्ष अस्लम शेख यांनी दिल्याची माहिती काँग्रेसचे माजी आमदार मधूकर ठाकूर यांनी दिली.तत्कालीन सरकारने सागरमाला प्रकल्पांतर्गत मांडवा येथे कोट्यवधी रुपये खर्चून रो-रो सेवेसाठी जेट्टी बांधली आहे. बाराही महिने जलप्रवास करता येईल, असा दावा मेरीटाइम बोर्डाने केला होता. जेट्टी बांधून दीड वर्ष पूर्ण झाले तरी येथून रो-रो सेवा अद्याप सुरू झालेली नाही. मान्सूनच्या लाटा परतवून लावण्यासाठी बांधण्यात आलेल्या ब्रेकवॉटर बंधाऱ्याची रचना योग्य नसल्याने गाळ मोठ्या प्रमाणावर बंदरात वाहून येत असल्याचे मेरीटाइम बोर्डाने आधीच स्पष्ट केले आहे.माजी आमदार मधुकर ठाकूर व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे सूतोवाच बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत, असे माजी आमदार ठाकूर यांनी स्पष्ट केले.मे. रॉक अ‍ॅण्ड रिफ ड्रेझिंग प्रा. लि. या कंपनीने मांडवा येथील गाळ काढण्याच्या कामामध्ये मेरीटाइम बोर्ड व मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याकडील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याने या कंपनीला मेरीटाइम बोर्डाने ब्लॅकलिस्टमध्ये टाकणे आवश्यक आहे, असे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ॅयाबाबत मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.जेट्टीसाठी एकूण १३५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे, असे असतानाही त्याचा कोणताही उपयोग नागरिकांना करता आलेला नाही.सरकार आणि प्रशासनाकडून रो-रो सेवा सुरू करण्यात येणार असल्याबाबत सातत्याने तारखा दिल्या जात आहेत.मात्र रो-रो सेवेला अद्यापही मुहूर्त सापडलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

टॅग्स :Raigadरायगड