शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये भाजपचे वर्चस्व; शिंदेसेना अन् मविआचा अस्तित्वासाठी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:05 IST

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाकडे नाही प्रमुख नेता;  सव्वालाख मतदार वाढले, फायदा कोणत्या पक्षाला? कोणाचे गणित बिघडणार

-वैभव गायकर

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : स्थापनेनंतर पनवेल महापालिकेत पहिल्या निवडणुकीपासून भाजपचे वर्चस्व आहे. या खेपेला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आ. विवेक पाटील हे कर्नाळा बँक घोटाळ्यात जेलमध्ये असून दुसरे नेते जे.एम. म्हात्रे हे भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे पक्षाचा प्रमुख नेत्यासाठीचा शोध सुरू आहे. तर शिंदेसेना, उद्धवसेना हे एकसंघ असल्यापासून व काँग्रेस व राष्ट्रवादीला अस्तित्वासाठी कायम झगडावे लागले. 

सिडकोने विकसित केलेल्या शहरात महापालिकेच्या स्थापनेनंतर हक्काची स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाली. पहिल्या महापौर म्हणून डॉ. कविता चौतमोल यांना संधी मिळाली. आरक्षणामुळे मागासवर्गीय महिलेच्या हाती सूत्रे दिली. नंतरच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतरही चौतमोल यांनाच आरक्षण बदलूनही कायम केले. 

सत्ताधारी राजवट संपल्यावर तत्कालीन आयुक्त गणेश देशमुखनंतर सध्या मंगेश चितळे प्रशासक म्हणून काम पाहात आहेत.

कोणते मुद्दे निर्णायक? 

पनवेल पालिका हद्दीत खारघर, कामोठे, कळंबोली, रोडपाली आणि तळोजामधील प्रदूषण, वाढीव मालमत्ता कर, अनियमित पाणीपुरवठा आणि ग्रामीण भागातील समस्या हे मुद्दे निर्णायक ठरतील.
महापालिकेची स्थापना भाजप आ. प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने झाली. पहिल्याच २०१७ सालच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. नंतरच्या काळात शेकापच्या १० नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला. 

महापालिकेत कुणाची होती सत्ता?

भाजप     ५१
शिवसेना     २३
राष्ट्रवादी     २
काँग्रेस     २

विकसित होणाऱ्या शहरांत पनवेल अग्रस्थानी 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील महापालिका असलेल्या शहरात अनेक महत्त्वाकांशी प्रकल्प आहेत. झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांत पनवेल अग्रस्थानी आहे. त्यामुळे या शहराच्या महापालिकेवर कोणाची सत्ता येते याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Panvel Municipal Corporation Electionपनवेल महापालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपा