शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडच्या दत्त देवस्थानाच्या महोत्सवाला ९२ वर्षांची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 23:54 IST

इ.स. १९२७ मध्ये या ठिकाणी पहिली जत्रा भरविण्यात आली. १९९७ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.

आगरदांडा : स्वामी ब्रम्हेंद्र महाराज धावडशीकर यांनी, अठराव्या शतकात मुरुड-जंजिरा येथील टेकडीवर दत्तगुरूंच्या पादुकांची स्थापना केली.

इ.स. १९०७ च्या सुमारास जंजिरा संस्थानच्या सरन्यायाधीशपदी असलेल्या राजाध्यक्ष यांनी या ठिकाणी दत्तगुरूंची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बांधले. १९२६-२७ च्या सुमारास मंदिराचे कळस व सभागृहासह मंदिराचे बांधकाम करण्यात आले. इ.स. १९२७ मध्ये या ठिकाणी पहिली जत्रा भरविण्यात आली. १९९७ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. श्री दत्त देवस्थान ट्रस्ट नोंदणीकृत आहे.सुमारे ३५० मीटर उंचावर असलेल्या दत्तमंदिरात जाण्यासाठी ३०९ पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या सभोवताली अडीच एकर मैदान असून, भक्तनिवासाचे काम प्रगतिपथावर आहे. ज्यांना पायºया चढणे शक्य नाही, अशांसाठी एक कि.मी. अंतर पार करून थेट दत्ताचे दर्शन घडू शकते.

दत्तजयंतीला यात्रेसाठी पंचक्रोशीतील तसेच श्रीवर्धन, म्हसळा व दिवेआगर या भागांतून मोठ्या संख्येने भक्त येत असतात.मुरुडचे मनोहारी रूप खºया अर्थाने इथून पाहता येते. पूर्वेस अंबोलीचे महाकाय धरण तर मावळतीला अथांग अरबी समुद्र, या ठिकाणी जंजिरा व पद्मदुर्ग सागरी किल्ले इतिहासाच्या गतस्मृतींना उजाळा देतात. दत्तजयंतीनिमित्त बुधवारी सलग ३५ वर्षे कीर्तनाच्या माध्यमातून सेवा करणारे परशुराम बुवा उपाध्ये (नाते -महाड) व देवस्थानचे माजी अध्यक्ष गोपाळ दवटे यांचा गौरव समारंभ पार पडला.

टॅग्स :Raigadरायगड