शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी गळती सुरूच, तब्बल हजारने पट घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 05:39 IST

कृतियुक्त ज्ञानरचनावादाचे धडे व आयएसओ शाळा या उपक्रमामुळे २०१६-१७ मध्ये जिल्हा परिषद शाळांतील गळती रोखून ५५६ इतका पट वाढविण्यात यशस्वी झालेला शिक्षण विभाग या वर्षी मात्र नापास झाला आहे.

पुणे  - कृतियुक्त ज्ञानरचनावादाचे धडे व आयएसओ शाळा या उपक्रमामुळे २०१६-१७ मध्ये जिल्हा परिषद शाळांतील गळती रोखून ५५६ इतका पट वाढविण्यात यशस्वी झालेला शिक्षण विभाग या वर्षी मात्र नापास झाला आहे. २०१७-१८ मध्ये युडायसमध्ये झालेल्या नोंदीनुसार १ हजार ७९ विद्यार्थी कमी झाले आहेत.खासगी शाळांबरोबर स्पर्धा करता येत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून राज्यभरात जिल्हा परिषद शाळांतील झपाट्याने घटत असलेली पटसंख्या ही बाब चिंताजनक आहे. अशा परिस्थितीतही गेल्या वर्षी कृतियुक्त अध्ययन पद्धती, आम्ही इंग्रजी शिकतो, संगणक प्रयोगशाळा, ई-लर्निंग, हस्ताक्षर सुधार, मोबाईल संगणक व्हॅन, सौर अभ्यासिका, शाळांना ग्रीन बोर्ड व इन्व्हर्टर पुरवणे, शिष्यवृत्ती सराव परीक्षा अशा अनेक उपक्रमांमुळे पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या ५५६ इतका वाढल्याचा दावा करण्यात आला होता. जिल्हा परिषद शाळांमधील गळती रोखणे हे आमचे स्वप्न होते, असे वक्तव्य तत्कालीन अध्यक्ष प्रदीप कंद व उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनी केले होते.२०१० पासून पटसंख्या गळती ही जिल्हा परिषद शाळांची मोठी समस्या निर्माण झाली आहे.खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील दर्जेदार शिक्षणामुळे दरवर्षी मोठी गळती होत आहे. २०१२-१३ या वर्षात पुणे जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या २ लाख ४६ हजार ७६५ इतकी होती. २०१३-१४ मध्ये ती २ लाख ३९ हजार ५३० इतकी होऊन ७ हजार २३५ इतकी विद्यार्थी गळती झाली होती. त्यानंतर २०१४-१५ मध्ये ३ लाख ३४ हजार ५६० इतकी होऊन गळती ४ हजार ९३४ पर्यंत आली होती. २०१५-१६ मध्ये यात लक्षणीय बदल होऊन पटसंख्या रोखून धरण्यात त्यांना यश आले होते. फक्त ३२६ इतकी गळती झाली होती. २ लाख ३४ हजार २७० इतका असलेला पट २०१६-१७ मध्ये २ लाख ३४ हजार ८२६ इतका होऊन पहिल्यांदाच पट ५५६ ने वाढला होता. यावर्षी पुन्हा मोठी गळती झाली असून २०१७-२०१८ ची पटसंख्या ही २ लाख ३३ हजार ७ ४७ इतका असून १०७८ इतकी विद्यार्थी गळती झाली आहे. २०१२ पासून २०१७ पर्यंत पाच वर्षांत १३ हजार १८ इतका पट कमी झाला आहे.शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाचशिक्षण विभाग विद्यार्थी पालकांना आकर्षित करण्यासाठी विविधउपक्रम राबवत असतो.त्यात ‘गुढीपाडवा व पट वाढवा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम होता. पटसंख्या नोंदीचा जिल्हा परिषदेने सप्ताह राबवून घरोघरी जाऊन तुमच्या मुलांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्या, असे सांगितले होते.विशेष म्हणजे या वेळी जिल्हा परिषद शाळा भौतिक सुधारणांबरोबर आयएसओ दर्जाच्या होत असून इ-लर्निंग, कृतियुक्त अध्ययन पद्धती, संगणकीकृत शाळा आदी विविध उपक्रम सुरू होते, असे असतानाही पट कमी झाला आहे.तालुका शाळा पटआंबेगाव २३५ १२२७९बारामती २७९ १६५०७भोर २७६ १००९३दौंड २९० २०७००हवेली २२९ २९६२१इंदापूर ३८२ २००११जुन्नर ३५५ १९३६१खेड ४०२ ३०९२३मावळ २८३ १७३६७मुळशी २१८ १४७५३पुरंदर २१९ १०३१८शिरूर ३६२ २८०२५वेल्हा १४५ ३७८९एकूण ३६७५ २३३७४७

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीPuneपुणे