शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीने मित्राकडून घेतले उसने पैसे; परत न केल्याने चाकूने हल्ला, किरकोळ कारणावरून घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 11:35 IST

उसने घेतलेले पैसे तरुणीला मागण्यासाठी आरोपी कोयता घेऊन का आला? याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे

लोहगाव : पुण्यात गेल्या काही दिवसांत गुन्ह्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. येरवडापोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्यामुळं तरुणीचा अखेर मृत्यू झाला आहे. आरोपी हा तिच्याच कंपनीतील सहकारी असून किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

 तरुणी कु. शुभदा शंकर कोदारे (२८) पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजी नगर भागात वास्तव्यास आहे. ती येरवडा येथील नामांकित आयटी कंपनी WNS कॅाल सेंटर येथे कामाला आहे. या प्रकरणी त्याच कंपनीत काम करणारा तिचा मित्र - कृष्णा सत्यनारायण कनोजा (२८) रा. खैरेवाडी, शिवाजीनगर पुणे याला येरवडा पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली आहे. मात्र या घटनेने पुन्हा एकदा पुणे हादरले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा आणि तरुणी एकाच कंपनीत कामाला आहेत. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास तरुणी काम संपवून वाहनतळावर आली. त्यावेळी तिथे असलेल्या कृष्णाने शुभदाला दिलेल्या उसन्या पैशावरून वाद घालण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपास गेला की त्याने तिच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. तरुणीने आरडाओरडा केल्याने तिथले सुरक्षारक्षक आले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती कळवण्यात आली. 

आरोपीने आर्थिक वादातून तरुणीवर हा जीवघेणा हल्ला केल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. वाद विवादावरून धारदार हत्याराने तिच्या उजव्या कोपरावर वार करून गंभीर जखमी केले होते. सदर जखमी मुलगी उपचारादरम्यान सह्याद्री हॉस्पिटल येरवडा येथे मृत्यू झाला. आरोपीने चाकू लपवून आणला होता. किरकोळ कारणासाठी चाकू का आणला? याबाबत चौकशी सुरू केली आहे. सदर मुलीची बहीण नामे - साधना शंकर कोदरे, 26 वर्षे हिच्या फिर्यादीवरून गुन्हा कलम - 103(1) BNS 4, 25 हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके व सहकारी पोलिस करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेLohgaonलोहगावPoliceपोलिसyerwadaयेरवडाDeathमृत्यूMONEYपैसाCrime Newsगुन्हेगारी