धायरी: सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक संबंधाच्या कारणावरून एका ४१ वर्षीय व्यक्तीची धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुपेश सुरेश भादिर्गे (वय ४१, रा. स्पंदन बिल्डिंग, नऱ्हे, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवराज गेजगे (रा. रेणुका नगरी, वडगाव बुद्रुक, पुणे) या आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवार, दिनांक १७ मे रोजी रात्री १०.०० ते १०.१५ वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथील विकास कृष्णा दांगट यांच्या घरासमोर घडली. याप्रकरणी मयत रुपेश यांचे भाऊ निलेश सुरेश भादिर्गे (वय ३८, व्यवसाय- सलून, रा. वारजे, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी युवराज गेजगे याच्या पत्नीचे आणि रुपेश भादिर्गे यांचे अनैतिक संबंध होते. याच गोष्टीचा राग आरोपी युवराज याच्या मनात होता. रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रुपेश हे वडगाव परिसरातील विकास दांगट यांच्या घरासमोर आले असता, आरोपी युवराजने त्यांना गाठले. दोघांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान हिंसेत झाले. आरोपीने स्वतःजवळील तीक्ष्ण आणि धारदार हत्याराने रुपेश यांच्यावर एकामागून एक सपासप वार केले. रुपेश यांच्या मानेवर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर वार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. गंभीर दुखापत झाल्यामुळे रुपेश यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी युवराज गेजगे घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे करत असून, फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
Web Summary : A 41-year-old man, Rupesh Bhadirge, was murdered in Pune due to an alleged affair. The accused, Yuvraj Gejge, is absconding after fatally attacking Bhadirge with a sharp weapon following an argument. Police are investigating.
Web Summary : पुणे में एक 41 वर्षीय व्यक्ति, रुपेश भादिर्गे की कथित अवैध संबंध के कारण हत्या कर दी गई। आरोपी युवराज गेजगे बहस के बाद धारदार हथियार से हमला कर फरार है। पुलिस जांच कर रही है।