शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
5
ना बाजारात विकत, ना जेवणात वापरत, भारतीत एकमेव शहर, येथे  कांदा, लसुणीच्या वापरावर आहे पूर्ण बंदी
6
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
7
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
8
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
9
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
10
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
11
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
12
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
13
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
14
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
15
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
16
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
17
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
18
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
19
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
20
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेले गुंड; मनपा आयुक्त मनसे नेत्यावर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 20:17 IST

माझी बैठक सुरु असताना तुम्ही थेट आत आलात, धमकी दिली, ही पद्धत योग्य आहे का?" असा सवाल आयुक्तांनी केला. यावर किशोर शिंदे यांनी प्रतिउत्तर दिलं

पुणे -  महापालिकेत आज चांगलाच गोंधळ उडाला, जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी थेट आयुक्तांच्या दालनात घुसले आणि त्यानंतर मनसे नेते किशोर शिंदे व मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी आयुक्तांनी थेट, "तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेले गुंड आहात," असे म्हणत मनसे कार्यकर्त्यांना धारेवर धरले. या वक्तव्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं.

अधिकच्या माहितीनुसार, आज पुणे महानगरपालिकेत आयुक्त नवल किशोर राम आपल्या दालनात एक बैठक घेत होते. त्याचवेळी मनसेचे नेते किशोर शिंदे काही कार्यकर्त्यांसह थेट त्यांच्या कक्षात प्रवेशले. या अनधिकृत प्रवेशामुळे आयुक्त भडकले आणि त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना तातडीने दालनाबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर कार्यकर्ते संतप्त होऊन बाहेरच ठिय्या देऊन बसले. या दरम्यान दोन्ही बाजूंनी शाब्दिक चकमक सुरु झाली.

आयुक्त संतापले"माझी बैठक सुरु असताना तुम्ही थेट आत आलात, धमकी दिली, ही पद्धत योग्य आहे का?" असा सवाल आयुक्तांनी केला. यावर किशोर शिंदे यांनी प्रतिउत्तर दिलं, "आम्ही काय धमकी दिली? आम्हाला दिलेली धमकी सुद्धा सांगा!" यावर आयुक्त म्हणाले, "तुम्ही दोन मिनिटं थांबू शकत नव्हता का? तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम करणारे गुंड आहात." याला प्रत्युत्तर देताना किशोर शिंदे यांनी विचारलं, "आम्ही गुंड कशामुळे आहोत हे तरी सांगा..."महापालिकेत तणावाचं वातावरणया संपूर्ण वादानंतर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासह आयुक्त दालनाच्या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिकेचं मुख्य गेट काही काळ बंद करण्यात आलं. दरम्यान, या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी, राजकीय पक्ष व महापालिका प्रशासन यांच्यातील हा संघर्ष अधिक उग्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2024