शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

शेतात काम करत असताना अचानक उष्माघाताचा त्रास; खुरपणी करताना महिला शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 17:00 IST

सकाळी ११ सुमारास उन्हाची तीव्रता अधिक असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले, उष्माघाताचा तीव्र झटका बसल्याने त्या जागीच कोसळल्या

वडगाव आनंद : सध्या संपूर्ण जुन्नर तालुक्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून, या वाढत्या उष्णतेचा एक भीषण बळी निमगाव सावा येथे गेला आहे. शेतात काम करत असताना अचानक उष्माघाताचा त्रास झाल्याने सौ. रुपाली भाऊ गाडगे (वय अंदाजे ४०) या महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे निमगाव सावा गावासह संपूर्ण परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निमगाव सावा येथील गावमाळा/माडीमळा परिसरातील रहिवासी असलेल्या सौ. रुपाली गाडगे या आज, सोमवार दि. २७ एप्रिल रोजी सकाळी आपल्या शेतात खुरपणीचे काम करत होत्या. सकाळी ११:४५ च्या सुमारास उन्हाची तीव्रता अधिक असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. उष्माघाताचा तीव्र झटका बसल्याने त्या जागीच कोसळल्या. त्यांना तातडीने मदत मिळेपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. एका कष्टकरी माऊलीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने गाडगे कुटुंबावर डोंगर कोसळला आहे.

मृत रुपाली गाडगे यांच्या पश्चात पती, मुले आणि मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ५:३० वाजता निमगाव सावा येथील कुकडी नदी तीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या तापमानामुळे विशेषतः शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत कष्टाची कामे टाळावीत. कामाच्या ठिकाणी सोबत पाणी, लिंबू सरबत किंवा ताक ठेवावे आणि डोक्याला रुमाल किंवा टोपीचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman farmer dies of heatstroke while working in field.

Web Summary : A woman farmer from Nimgaon Sava died of heatstroke while working in her field. The incident highlights the dangers of extreme heat, prompting advisories for outdoor workers to stay hydrated and avoid peak sun hours.
टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरTemperatureतापमानFarmerशेतकरीWomenमहिलाDeathमृत्यूHeat Strokeउष्माघातHealthआरोग्य