घरच्या मैदानातील पराभवाचा बदला घेण्यासाठी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर उतरलेल्या गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पहिल्यांदा गोलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सची अवस्था बिकट केल्याचे पाहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी ज्या मैदानात धावांची 'बरसात' झाली, त्या मैदानात RCB च्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूड यांच्यात विकेट्स घेण्याची स्पर्धा रंगली. दोघांच्या भेदक माऱ्यासमोर दिल्ली कॅपिटल्सचा संघाचे फलंदाज हतबल ठरले. पहिल्या चार षटकांत अवघ्या ८ धावांवर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ६ विकेट्स गमावल्या. आयपीएलच्या इतिहासात पॉवर प्लेमध्ये ६ विकेट्स गमावणारE दिल्ली कॅपिटल्स दुसरा संघ ठरला. याआधी २०११ मध्ये कोची टक्कर्सवर ही नामुष्की ओढावली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भुवी-हेजलवूड यांच्यात विकेट घेण्याची स्पर्धा
भुवनेश्वर कुमारनं आपल्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या १८ वर्षीय साहिल पारख याला खातेही न उघडता तंबूचा रस्ता दाखवला. जोश हेजलवूडनं लोकेश राहुलची विकेट घेत आपलं खाते उघडलं. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या समीर रिझवीला आल्या पावली माघारी धाडत हेजलवूड हॅटट्रिकवर पोहचला होता. दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील तिसऱ्या आणि आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात भुवीनं ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेलची विकेट घेतली. चौथ्या षटकात हेलवूडनं नितिश राणाची शिकार केली. RCB च्या ताफ्यातील दोन जलदगती गोलंदाजांच्या जणू विकेट घेण्याची स्पर्धाच रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न; पॉवर प्लेमध्ये नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
भुवी आणि जोश हेजलवूड यांचा भेदक माऱ्यासमोर झालेली बिकट अवस्था हे दिल्लीकरांसाठी एक भयावह स्वप्नच होते. ज्या मैदानात शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात ५०० पेक्षा अधिक धावा झाल्या तिथं दिल्ली कॅपिटल्सच्या संघावर पॉवर प्लेमधील निच्चांकी धावसंख्येच्या रेकॉर्डची नोंद झाली. पॉवर प्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ६ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त १३ धावा केल्या. याआधी पॉवर प्लेमधील निच्चांकी धावसंख्येचा रेकॉर्ड हा राजस्थान रॉयल्सच्या नावे होता. २००९ मध्ये आरसीबी विरुद्धच्या सामन्यात RR च्या संघाने २ विकेट्स गमावत फक्त १४ धावा काढल्या होत्या.
Web Summary : RCB's Bhuvi and Hazlewood wreaked havoc on Delhi Capitals, claiming six wickets for just eight runs in the powerplay. Delhi's batting crumbled under pressure, mirroring a 2011 Kochi Tuskers' collapse. The home ground advantage turned into a nightmare for Delhi.
Web Summary : आरसीबी के भुवी और हेज़लवुड ने दिल्ली कैपिटल्स पर कहर बरपाया, पावरप्ले में सिर्फ आठ रन पर छह विकेट लिए। दिल्ली की बल्लेबाजी दबाव में चरमरा गई, जो 2011 में कोच्चि टस्कर्स के पतन को दर्शाती है। दिल्ली के लिए घरेलू मैदान का फायदा एक बुरे सपने में बदल गया।