शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 19:04 IST

1 / 7
अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतच तणावाची स्थिती आहे. यामुळे संपूर्ण जाग ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. इंधन पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे.
2 / 7
अशा एकूण परिस्थितीत भारत सरकार आणि तेल विपणन कंपन्या १ मे २०२६ पासून काही महत्त्वाचे नियम लागू करण्याची शक्यता आहे. यातच मे महिन्यापासून एलपीजी (LPG) सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्येही मोठ्या बदलांची चर्चा सुरू आहे.
3 / 7
एकूण परिस्थिती पाहता, १ मे २०२६ पासून संपूर्ण देशभरात एलपीजी दरात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका-इस्रायल-इराण युद्धापासून, भारतीय तेल कंपन्यांनी देशभरात १४.२-किलोग्राम एलपीजी सिलेंडरच्या दरात ६० रुपयांनी वाढ केली होती. तर १९-किलोग्राम एलपीजी सिलेंडरचे दर केवळ एकाच महिन्यात तीन वेळा वाढले आहेत.
4 / 7
एप्रिल २०२६ साठी, महानगरांमध्ये १९-किलोग्रॅम एलपीजी सिलेंडरची किंमत ₹१९६ ने वाढवून ₹२१८ करण्यात आला आहे. ७ मार्च रोजी तेल कंपन्यांनी (OMCs) प्रति सिलेंडर दरात ११४.५ रुपयांची वाढ केली होती. तत्पूर्वी, १ मार्च २०२६ रोजी सिलिंडरच्या दरात २८ ते ३१ रुपयांची वाढ झाली होती.
5 / 7
वाढू शकतो बुकिंगचा कालावधी - माध्यमांतील वृत्तांनुसार, नव्या नियमांनुसार, ग्राहकांना एका सिलिंडरच्या डिलिव्हरीनंतर किमान २५ दिवसांनीच दुसरे बुकिंग करता येईल. तसेच, उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना किमान ४५ दिवसांनंतरच बुकिंग करता येईल, असे बोलले जात आहे.
6 / 7
आता 'DAC' कोड अनिवार्य! - आता, एलपीजी सिलेंडरच्या डिलिव्हरी वेळी, आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड (OTP) अथवा डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) पाठवला जाईल. डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला हा कोड देणे अनिवार्य असेल. त्याशिवाय आपली डिलिव्हरी यशस्वी मानली जाणार नाही.
7 / 7
याशिवाय, आता गॅस कंपन्यांनी बायोमेट्रिक ई-केवायसीवरही (e-KYC) भर दिला आहे. जर तुमचे केवायसी अपडेट नसेल, तर गॅस बुकिंग अथवा सबसिडी रोखली जाऊ शकते. ग्राहक 'Hello BPCL' किंवा 'IndianOil One' सारख्या ॲपद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईAmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायलWarयुद्धCylinderगॅस सिलेंडर