IPL 2026 RCB vs DC : आयपीएल २०२६ स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का बसला आहे. संघातील धडाकेबाज सलामीवीर फिल सॉल्ट अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नसल्याने तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यालाही मुकणार आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्धच्या मागील सामन्यातही सॉल्ट संघाबाहेर होता. आणि आता त्याच्या पुनरागमनासाठी आणखी वेळ लागणार हे स्पष्ट झालं आहे. आरसीबीचे मेंटर आणि फलंदाजी प्रशिक्षक दिनेश कार्तिक यांनी स्वतः याची पुष्टी केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कार्तिकने फिटनेसबाबत दिली माहिती
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत दिनेश कार्तिक यांनी स्पष्ट सांगितलं की, फिल सॉल्ट सध्या दुखापतग्रस्त आहे. मागील सामन्यात सॉल्टच्या जागी जेकब बेथेलला संधी देण्यात आली होती. तो या संधीच सोनं करण्यात अपयशी ठरला. तो फक्त १० चेंडूत १४ धावा करून बाद झाला. सॉल्टच्या अनुपस्थितीत बेथेलला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे.
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
दिनेश कार्तिक याने विराट कोहलीचंही भरभरून कौतुक केलं. तो प्रत्येक वर्षी मागे वळून स्वतःच्या खेळाचं विश्लेषण करतो. काय केलं? काय सुधारायचं? यासंदर्भातील स्पष्ट योजना तयार करून तो मैदानात उतरतो. त्याच्याकडे खेळण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. विराटकडे अफाट अनुभव आहे.
हिशोब चुकता करण्याची वेळ?
गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सध्या कमालीची कामगिरी करत असून ७ सामन्यांत ५ विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, या हंगामातील दोन पैकी एक पराभव हा त्यांना दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातच ओढावला होता. हा हिशोब चुकता करत गुणतालिकेत आपले स्थान भक्कम करण्यासाठी RCB संघ मैदानात उतरेल.
Web Summary : Royal Challengers Bangalore faces a blow as Phil Salt remains injured and will miss the Delhi Capitals match. Jacob Bethell may get another chance. Dinesh Karthik praised Virat Kohli's analysis and planning. RCB aims to settle scores after a previous loss to DC.
Web Summary : रॉयल चैलेंजर्स बैंगलोर को झटका, फिल सॉल्ट चोट के कारण दिल्ली कैपिटल्स के खिलाफ मैच से बाहर। जैकब बेथेल को फिर मौका मिल सकता है। दिनेश कार्तिक ने विराट कोहली की योजना और विश्लेषण की सराहना की। आरसीबी का लक्ष्य डीसी से पिछली हार का हिसाब चुकता करना है।