जग इतके विभागलेले का आहे? पॅम्प्लेट वाटून धर्माचा प्रचार, पुण्यातील ३ अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:42 IST2026-04-29T15:40:17+5:302026-04-29T15:42:44+5:30

या तीन अमेरिकन नागरिकांनी धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्यासाठी 'एका विशिष्ट धर्माचा देव सर्वात मोठा आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही', असा सुद्धा प्रचार केला.

Why is the world so divided? 3 American citizens in Pune ordered to leave the country for distributing pamphlets to promote religion | जग इतके विभागलेले का आहे? पॅम्प्लेट वाटून धर्माचा प्रचार, पुण्यातील ३ अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याचे आदेश

जग इतके विभागलेले का आहे? पॅम्प्लेट वाटून धर्माचा प्रचार, पुण्यातील ३ अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याचे आदेश

पुणे: जग इतके विभागलेले का आहे? अशा मजकुराचे पॅम्प्लेट वाटून धर्माचा प्रचार करण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात हे पॅम्प्लेट वाटून धर्मांतराचा प्रयत्न करत असल्याचे आले निदर्शनास आले. टुरिस्ट व्हिसावर येऊन धार्मिक प्रचार करणाऱ्या तीन अमेरिकन नागरिकांना पुणेपोलिसांनी आदेश देत १० मे पर्यंत देश सोडण्यास सांगितले आहे. पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात या तीन अमेरिकन नागरिकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेम्स हडसन (६५), फ्रान्त्झ थॉमस (५३) आणि गॅरी जीन (६४) असे या तिघांची नावे आहेत. २६ वर्षीय ड्रायव्हरने पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे नागरिकत्व असलेले  हे तिघे पर्यटक टुरिस्ट व्हिसा वर भारतात आले. आणि त्यानंतर पिंपरी येथील एका हॉटेल मध्ये ते वास्तव्यास होते. २६ एप्रिल रोजी ते पुणे शहरातील शुक्रवार पेठेत आले. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडील पॅम्प्लेट नागरिकांना वाटायला सुरुवात केली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत असलेल्या या पॅम्फलेट वर "जग इतके विभागलेले का आहे" असा मजकूर लिहिण्यात आला होता. तसेच या तिघांनी धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्यासाठी "एका विशिष्ट धर्माचा देव सर्वात मोठा आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही", असा सुद्धा प्रचार केला. हे अनुभवलेल्या एका चालकाने थेट पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली हा सगळा प्रकार पुणे पोलिसांच्या एफ आर ओ ( फॉरेनर्स रीजनल रजिस्ट्रेशन ऑफिस) यांच्या समोर आल्यानंतर त्यांनी या तिघांना देश सोडून जाण्यासाठी नोटीस बजावली आहे..

Web Title : पुणे में पर्चे बांट रहे अमेरिकी धर्म प्रचारकों को भारत छोड़ने का आदेश।

Web Summary : पुणे में धार्मिक पर्चे बांटकर धर्मांतरण का प्रयास कर रहे तीन अमेरिकी नागरिकों को 10 मई तक भारत छोड़ने का आदेश दिया गया। उन्होंने एक विशिष्ट धर्म को बढ़ावा देकर पर्यटक वीजा नियमों का उल्लंघन किया, जिसके कारण पुलिस कार्रवाई हुई।

Web Title : American preachers distributing pamphlets in Pune ordered to leave India.

Web Summary : Three American citizens distributing religious pamphlets in Pune, attempting conversions, were ordered to leave India by May 10th. They violated tourist visa rules by promoting a specific religion, leading to police action.