शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

आम्हांला कुणी विचारणार आहे की नाही ? ज्येष्ठ नागरिकांचा प्रशासनाला खडा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 7:30 PM

कंटाळा आल्याने दोन शब्द शेजारच्या व्यक्तीशी बोलण्यास गेलो असता ते लोक आम्हाला कोरोना झाला आहे अशा पद्धतीने वागणूक देतात.

ठळक मुद्देपाय मोकळे करून यावं म्हटलं तरी सगळीकडे जाण्यास मनाई

 युगंधर ताजणे- पुणे : दिवसभर घरात बसून असतो. कंटाळा आल्याने दोन शब्द शेजारच्या व्यक्तीशी बोलण्यास गेलो असता ते लोक आम्हाला कोरोना झाला आहे अशा पद्धतीने वागणूक देतात. घरातील लहान मुलांना जवळ घेतले, त्यांची लाडाने, मायेने विचारपूस केली ती देखील घरातल्या माणसांना खपत नाही. पाय मोकळे करून यावं म्हटलं तरी सगळीकडे जाण्यास मनाई केल्याने कुठे जाता येत नाही. अशावेळी अडकून पडल्यासारखे झाले आहे. आम्हाला कुणी विचारणार आहे की नाही ? असा प्रश्न ज्येष्ठ मंडळी विचारू लागली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नोकरदार व्यक्ती, महिला, लहान मुले, यांच्याकरिता प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र त्यात ज्येष्ठ व्यक्तींना डावलण्यात आले असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. शहरात सध्या 38 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. 45 टक्के पेन्शनधारक आहेत. तसेच शहरातल्या ज्येष्ठ नागरिक संघाची संख्या 210 इतकी असून कोथरुड भागात 54 ते 60 ज्येष्ठ नागरिक आहेत. सध्या कोरोनामुळे सर्वजण घरात बसून आहेत. सर्वांना काळजी व स्वयंशिस्त बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र यात ज्येष्ठ नागरिक कुठे आहे? हा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे कोथरूड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष श्रीराम बेडकिहाळ यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, पहाटे, सायंकाळी फिरण्यासाठी ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडतात. आता ते काही दिवसांपासून बंद झाले आहे. गप्पा मारण्यासाठी एकमेकांकडे जाणे बंद झाले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे औषधे घेणे अवघड झाले आहे. साधारण आठ ते दहा दिवस पुरेल एवढा त्यांचा साठा करता येतो. पुढे काय? ती औषधे मागविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अद्याप कित्येक ज्येष्ठ नागरिकांकडे मोबाईल फोन नाही. मुले कामानिमित्त परदेशी असल्याने ते घरात एकटे आहेत. यावेळी काय करणार? कोण मदतीला धावून येते. तसेच काहीजण पेन्शनधारक आहेत. त्यांना किमान पैसे मिळतात. मात्र अनेक व्यक्तींना पैशासाठी झगडावे लागते. हे कुणाच्या गावी नाही. सामाजिक सेवाभावी संघटना मदत करतात. परंतु त्याला मयार्दा आहेत. एखादा गंभीर प्रसंग ओढवला गेल्यास काय करणार याची चिंता त्यांना भेडसावते. शासनाने त्यांच्या खात्यावर किमान पैसे जमा करावेत. आणि वयाची अट न ठेवता त्यांना विमा संरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे. कुणाकडे बोलायला जायची भीती आहे. फिरण्याची भीती आहे. सगळ्याच सोसाट्यामध्ये फिरण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना नाईलाजाने घरात बसावे लागते. याशिवाय बँकेत जाता येईना, आपण कुणाला सांगितले चालढकल केली जाते. लवकर कुणी ऐकत नाही. अनेकदा बँकेत गेल्यावर कळते पुरेसे पैसे खात्यावर नाहीत. मुलांनी तातडीने पैसे पाठविणे गरजेचे असल्याने ते न मिळाल्याने चिडचीड होत असल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिक करत आहेत. 

* कोरोनामुळे शहरात जो बंद आपण पाळत आहोत त्यासाठी पोलीस याबरोबरच अनेक संघटना चांगले सहकार्य करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी आपला हेका सोडून बदलत्या काळानुसार जगायला हवे. सध्याची तरुनपिढी आणि आपण यात समन्वय कसा साधला जाईल याचा विचार करावा. वयाच्या मानाने ज्येष्ठ नागरिकांकडून चुका होतात हे मान्य आहे. मात्र त्यांनी आपल्या स्वभावाला मुरड घालण्याची आवश्यकता आहे. पिढी दर पिढी प्रत्येकाचे अनुभव बदलत जातात. तेव्हा आपण सामंजस्य दाखवावे. - अरविंद कान्हेरे ( संस्थापक / अध्यक्ष - जागृती ज्येष्ठ नागरिक संघ, इंद्रप्रस्थ ज्येष्ठ नागरिक संघ, पुणे)

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHomeघरFamilyपरिवारHealthआरोग्य