Join us  

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

T20 World Cup 2024 News: जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 6:21 PM

Open in App

T20 World Cup 2024 : जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. २० संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात असणार आहेत. या स्पर्धेसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे बहुतांश खेळाडू आयपीएलमध्ये व्यग्र आहेत. आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार संपताच क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटच्या विश्वचषक खेळवला जाईल. भारतीय संघ पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वात मोठ्या व्यासपीठावर खेळताना दिसेल.

रोहित कर्णधार असला तरी टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा कोण सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या यादीत हार्दिक पांड्या आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. 'क्रिकबज'ने दिलेल्या वृत्तानुसार, पंत उपकर्णधारपदासाठी हार्दिकला चांगलीच टक्कर देत आहे. 

विश्वचषकातील भारताचे सामने -

  • ५ जून - भारत विरूद्ध आयर्लंड, न्यू यॉर्क
  • ९ जून - भारत विरूद्ध पाकिस्तान. न्यू यॉर्क
  • १२ जून - विरूद्ध अमेरिका, न्यू यॉर्क
  • १५ जून - विरूद्ध कॅनडा, फ्लोरिडा 

विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा. 

विश्वचषकासाठी चार गट - 

  1. अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
  2. ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
  3. क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
  4. ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024हार्दिक पांड्यारिषभ पंतभारतीय क्रिकेट संघ