शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 4:28 PM

Satara Lok Sabha Election 2024: साताऱ्यात उदयनराजे भोसले विरूद्ध शशिकांत शिंदे अशी थेट लढत होणार आहे.

Udayanraje Bhosale | सातारा : सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा कमळ चिन्हावर आपले नशीब आजमावत आहेत. यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचे आव्हान आहे. कधीकाळी एकमेकांसाठी मत मागणारे शरद पवारांचे हे दोन्ही शिलेदार आता लोकसभेला एकमेकांविरोधात लढत आहेत. पण, लोकसभेला प्रथमच 'घड्याळा'ची कमी असल्याने याचा फटका आणि फायदा कोणाला होतो हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. यावेळी सातऱ्यात तुतारी विरूद्ध कमळ अशी थेट लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी 'लोकमत' व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 

उदयनराजे भोसले म्हणाले की, उमेदवारीबाबत माझ्या मनात शंका नव्हती. वेळ लागला असला तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह इतर मित्रपक्षांसोबतच्या चर्चेत वेळ जातच असतो. आम्ही नुकताच संकल्पनामा जाहीर केला आहे. १० हजार कोटी रूपयांची कामे माझ्या माध्यमातून झाली आहेत. तसेच खासदार झाल्यावर काय रोडमॅप असेल यावर त्यांनी सांगितले की, नमो गंगाचे जसे शुद्धीकरण झाले त्याच पद्धतीने नमो कृष्णाचे शुद्धीकरण झाले पाहिजे. पाणी दूषित होऊन काही होऊ नये आणि लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रयत्न करणार आहे. 

उदयनराजेंची टोलेबाजी 

तसेच शरद पवार कॉलर उडवत आहेत, ते असे करत आहेत कारण की, ते माझी स्टाईल करून मी चांगले काम करत असल्याचे सांगत आहेत. ते कॉलर उडवून याचे संकेत देत आहेत. त्यांना देखील माहिती आहे की, आपल्या पक्षाने चुकीचा उमेदवार दिलाय. मी मित्र मंडळीसोबत बसलो असताना कॉलर उडवण्याचा किस्सा घडला. रविवारचा दिवस होता बॉलिवूड आणि हॉलिवूडबद्दल गप्पा रंगल्या होत्या. मग राजकारणाचा विषय निघाला तेव्हा पॉलिटिक्सचा 'पॉलिवूड' अशी चर्चा झाली. तेव्हा मी बोललो की पॉलिटिक्स म्हणजे पॉलिवूड... फरक फक्त एवढाच की तिकडे रिटेक घेता येतो इथे नाही. एकतर इन नाही तर आऊट असे इथे असते. राज्याचे पॉलिवूड झालंय असे मी म्हणत नाही. पण, काही लोकप्रतिनिधी लोकांकडे दुर्लक्ष करतात, घोटाळे करतात. कुणी काय कमावले हे मला माहिती नाही पण मी लोकांचा विश्वास कमावला असून, यात मी समाधानी आहे, असेही उदयनराजेंनी नमूद केले.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४