तुम्हाला पुण्यात बोलावले कोणी होते?;अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 12:48 AM2020-12-27T00:48:04+5:302020-12-27T07:06:08+5:30

‘मी कोल्हापूरला परत जाईन,’ असे वक्तव्य पाटील यांनी शुक्रवारी केले होते.

Who called you in Pune?; Ajit Pawar's tweak to Chandrakant Patil | तुम्हाला पुण्यात बोलावले कोणी होते?;अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना चिमटा

तुम्हाला पुण्यात बोलावले कोणी होते?;अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना चिमटा

Next

पुणे : ‘‘कोल्हापूरला परत जाईन म्हणता, पण तुम्हाला इथे बोलावले कोणी होते ते सांगा!’’, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार चिमटा काढला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावताना पवार म्हणाले, पुण्यात येऊन बैलगाडीत बसून फोटो काढण्यापेक्षा दिल्लीत जाऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करा!
कोरोना आजारातून बरे झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी पुण्यात आलेल्या अजित पवार यांनी शनिवारी विधानभवनात प्रशासकीय बैठक घेतली. 

‘मी कोल्हापूरला परत जाईन,’ असे वक्तव्य पाटील यांनी शुक्रवारी केले होते. त्यावर पवार म्हणाले, “परत जाईन म्हणता, पण तुम्हाला आधी इथे बोलावले कोणी होते ते सांगा! फडणवीस म्हणत की ‘मी परत येईन, परत येईन,’ तर आता त्यांचे सहकारी ‘मी परत जाईन, परत जाईन’ असे म्हणत आहेत. खरे तर त्यांना कोणीही बोलावले नव्हते, पण तरीही ते  आले. त्यांच्या येण्याने  कोथरूडमधील आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी  आणि त्यांचे कार्यकर्ते मात्र नाराज झाले.” 
 

Web Title: Who called you in Pune?; Ajit Pawar's tweak to Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.