शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 09:54 IST

पिंपरी चिंचवड राष्टवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी भाजपाने ताकद लावली आहे. 

भाजपाने पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. १२८ जागांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक होत आहे. अर्ज भरण्याची धामधूम सुरू असतानाच भाजपाचे आमदार शंकर जगताप यांनी भाजपा १२५ जागा जिंकणार, तर अजित पवारांना ३ जागा मिळतील,  असा दावा केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते राहुल कलाटे यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपाची ताकद आणखी वाढली आहे. दुसरीकडे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का असल्याचे मानले जात आहे. 

आधी म्हणाले १०० जागा, आता १२५

राहुल कलाटे यांनी पक्षात प्रवेश करण्यापूर्वी आमदार शंकर जगताप यांनी महापालिका निवडणुकीत भाजपा १०० जागा जिंकेल, असे म्हटले होते. कलाटे यांच्या प्रवेशानंतर आता त्यांनी भाजपाला १२५ जागा मिळतील असा दावा केला आहे. 

पक्षाचा आदेश अंतिम

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये राहुल कलाटे यांनी समर्थकांसह प्रवेश केला. त्यामुळे भाजपातील इच्छुकांना संधी न मिळण्याची अंदाज व्यक्त केले जात आहे. भाजपामधील कार्यकर्ते नाराज होतील का, या प्रश्नावर शंकर जगताप म्हणाले, "माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल, तर आम्ही त्याच्या पाठीशी राहू. आमच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ. पक्षश्रेष्ठींचा आदेश हा भाजपामध्ये अंतिम मानला जातो. कुणी पक्षात येत असेल, तर त्याचे स्वागतच करू." 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Claims Victory in Pimpri, Predicts Few Seats for Pawar.

Web Summary : BJP confident of winning 125 Pimpri-Chinchwad municipal seats, says MLA Jagtap. NCP (Ajit Pawar) projected to win only three. Recent BJP entry of Rahul Kalate boosts party.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवार