शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

"खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, जमिनीबाबत समाधानकारक तोडगा काढू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 17:59 IST

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार; खासदार डॉ. अमोल कोल्हे

ठळक मुद्देरेल्वेमार्ग बाधित शेतकऱ्यांना जमिनीची किंमत वाटाघाटींद्वारे ठरवली जाणार आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे

राजगुरुनगर: रेल्वे प्रकल्प व रिंग रोड अंमलात येणे गरजेचे आहे. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत समाधानकारक तोडगा काढूनच हा प्रकल्प कार्यान्वित करण्यास प्राधान्य राहील. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवा करणार असून  त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

खेड तालुक्यात प्रास्तावित रेल्वे व रिंगरोड हे दोन्ही प्रकल्प येऊ घातले आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. यासाठी रेल्वे बाधित शेतकऱ्यांच्या समस्या व भावना जाणून घेण्यासाठी खासदार कोल्हे राजगुरूनगर येथे आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी समस्यांचा पाढा खासदारासमोर मांडला.

शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नाचे व समस्याचे खासदार कोल्हे यांनी निरसन केले. रेल्वेमार्गबाधित शेतकऱ्यांचे संपूर्ण शंकानिरसन करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी दिल्या.

शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेण्यात येईल. शेतकऱ्यांना न्याय देण्याचीच शासनाची भूमिका राहील. रेल्वेमार्ग बाधित शेतकऱ्यांना जमिनीची किंमत वाटाघाटींद्वारे ठरवली जाणार आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. रेल्वे आणि रिंग रोड या दोन्ही प्रकल्पांनी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद करण्याचे प्रयत्न करणार आहे. अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. 

खेड मध्ये होणारे विमानतळ रद्द झाल्याने खेड तालुक्याचे मोठे नुकसान झाले. पण आता पुणे नाशिक रेल्वेमुळे हा मतदार संघ थेट उत्तर आणि दक्षिण भारताशी जोडला जाणार असल्याने विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे तो अंमलात येणे गरजेचे असल्याच ते म्हणाले आहेत.  

टॅग्स :PuneपुणेKhedखेडrailwayरेल्वेFarmerशेतकरीGovernmentसरकार