शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

School Reopen In Pune: पुण्यातील शाळांबाबत वेट अ‍ॅण्ड वाॅच; अजितदादांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 20:37 IST

रुग्ण संख्या उच्चांकी वेगाने वाढत असल्याने थोड थांबण्याचा टाक्स फोर्सचा सल्ला

पुणे : गेल्या दोन- तीन दिवसांत पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या उच्चांकी वेगाने वाढत आहे. अशा स्थितीमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी किमान 15 दिवस वेट अ‍ॅण्ड वाॅच चा सल्ला पुण्याच्या टाक्स फार्सने दिला आहे. यामुळेच शाळा सुरू करायच्या किंवा नाही या संदर्भात शनिवार (दि.22) रोजी उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणा-या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राज्य शासनाने सुरू केलेल्या शाळा पुन्हा बंद केल्या. परंतु राज्यात इतर सर्व गोष्टी सुरू ठेवल्याने शासनावर टीका सुरू झाली. यामुळे येत्या सोमवार (दि. 24) पासून पुन्हा एकदा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले असून, कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन हा निर्णय घेण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात शनिवारी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांत शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. येत्या आठ - दहा दिवसांत ही संख्या अधिक वेगाने वाढू शकते. सध्या राज्यात पुणे पुन्हा एकदा कोरोनाचे व्हाॅटस्पोट बनले आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घाईचा ठरू शकते, असे टाक्स फोर्सचे म्हणणे आहे. यामुळेच सर्व लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून हा निर्णय घेण्यात येणार आहे.

शाळांबाबत निर्णय बैठकीत ठरणार 

''शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता शाळा सुरू करण्यासंदर्भात थोडा विचार करावा लागेल. शाळा सुरू करायच्या किंवा कसे याबद्दलची चर्चा शनिवारी(  दि.22) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत होणार आहे असे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी सांगितले.''  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारcollectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षणSchoolशाळा