शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरात मतदानाला गालबोट; राष्ट्रवादीच्या २ गटात गदारोळ, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 15:31 IST

शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीत कायद्याचा भंग केला जात होता, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाने आवाज उठवला असता त्याला मारहाण करण्यात आली

इंदापूर : ऐन मतदानाच्या दिवशी लाखेवाडी गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांना १५ ते २० जणांच्या जमावाने बेदम मारहाण केली. चौघांविरुद्ध पोलीसांकडे गुन्हा दाखल झाला आहे.हल्ल्यात जखमी झालेल्या बबन रामचंद्र खाडे (वय ७१ वर्षे, रा.लाखेवाडी, ता.इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन प्रभाकर तुकाराम खाडे,संतोष प्रभाकर खाडे, शुक्रराज संतोष खाडे,धनराज प्रदीप खाडे ( सर्व रा. लाखेवाडी, ता.इंदापूर) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

  फिर्यादी खाडे निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. लाखेवाडी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून काम पहातात. आज ( दि.२०) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर चाललेली भांडणे मिटवली. त्याचा राग मनात धरुन उपरोक्त आरोपींपैकी संतोष खाडे याने त्यांना दगड फेकून मारला. इतरांनी लाथाबुक्क्या व काठीने मारहाण केली. त्यामुळे त्यांना डोक्याला व तोंडाला मार लागला, असे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.    दरम्यान आरोपी हे हर्षवर्धन पाटील गटाचे आहेत. निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर कायद्याचा भंग करत व घाबरवून लोकशाही प्रक्रियेला बाधा आणण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. लाखेवाडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बबन खाडे यांनी अशा प्रकारच्या घटनांविरोधात आवाज उठवल्याने त्यांना मारहाण झाल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४indapur-acइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार