Video: जुन्या जमिनीचा वाद; थेट अंगावरचं गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, चाकणमधील थरारक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 14:53 IST2026-05-12T14:52:44+5:302026-05-12T14:53:28+5:30
घराजवळ येताच आरोपींनी फिर्यादीच्या अंगावर भरधाव वेगाने गाडी घातली, सुदैवाने ते बाजूला झाल्यामुळे या हल्ल्यात त्यांचा जीव वाचला

Video: जुन्या जमिनीचा वाद; थेट अंगावरचं गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, चाकणमधील थरारक घटना
पुणे: चाकण जवळील खालूब्रे परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या जमिनीच्या वादातून एका व्यक्तीच्या अंगावर कार घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जुन्या जमिनीचा वाद; थेट अंगावरचं गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, चाकणमधील थरारक घटना#pune#chakan#car#crime#accidentpic.twitter.com/Cb0h7h1FXY
— Lokmat (@lokmat) May 12, 2026
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचे थरारक फुटेज आता समोर आले आहे. या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलिसांनी आरोपी खंडू बापू पवार, माजी व्हाईस चेअरमन पोपट बापू पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केल आहे. फिर्यादी किरण बबन शिंदे हे आपल्या घराकडे जात असताना, आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. जुन्या जमिनीच्या गटांच्या वादावरून घरा शेजारी दबा धरून फिर्यादी घराजवळ येताच त्यांच्या अंगावर भरधाव वेगाने गाडी घातली. सुदैवाने फिर्यादी बाजूला झाल्यामुळे या हल्ल्यात त्यांचा जीव वाचला आहे. मात्र, आरोपींचा हा जीवघेणा प्रयत्न सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे. महाळुंगे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक सचिन महाडिक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.