पुणे : उन्हाचा तडाखा वाढल्याने रविवारी (दि.२६) पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने कमी झाली. वाढत्या उन्हामुळे मागणी कमी असल्याने बाजारात फळभाज्यांना उठाव नाही. परिणामी भेंडी, गवार, गाजर, हिरवी मिरची, शेवगा आणि तोतापुरी कैरीच्या भावात दहा ते वीस टक्के घट झाली होती. आवक कमी झाल्याने केवळ श्रावणी घेवड्याच्या भावात काहीशी वाढ झाली होती, तर उर्वरित सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर होते.
गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि.२६) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, उत्तर प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १४ ते १५ टेम्पो, भुईमूग शेंग कर्नाटक आणि गुजरात प्रत्येकी १ टेम्पो, गाजर कर्नाटक ५ टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी ४ ते ५ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा ४ ते ५ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा २ टेम्पो, गुजरात कर्नाटकमधून भुईमूग शेंग प्रत्येकी २ ते ३ टेम्पो, हिमाचल येथून वाटाणा ३ टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे १० ते १२ टेम्पो, तर इंदौर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून बटाटा ४० टेम्पो इतकी आवक झाली होती, तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ४५० ते ५०० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार क्रेट, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२, कोबी ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, गाजर ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा २ टेम्पो, पावटा २ ते ३ टेम्पो, शेवगा २ टेम्पो, घेवडा २ टेम्पो, कांदा सुमारे १०० टेम्पो इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : ८०-११०, बटाटा : ६०-१३०, लसूण : ८००- १८००, आले सातारी : २६०-४५०, भेंडी : १५०-२५०, गवार : २००-३००, टोमॅटो : १००-१४०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : १००-३००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी :१००-२००, काकडी : १२०- १६०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १५०- १८०, पापडी : २५०-३००, पडवळ : १६०-२००, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : ६०- १००, वांगी : २००-२५०, डिंगरी : २००-३००, नवलकोल : ५०-६०, ढोबळी मिरची : १५०- ३००, तोंडली : कळी : १५०-२५०, जाड : ८०-१००, शेवगा : १००-२००, गाजर : १००-२००, वालवर : २५०-३५०, बीट : १५०-१६०, घेवडा : ६००-८००, कोहळा : १००-१५०, आर्वी: २००-२२०, घोसावळे : १६०-२००, ढेमसे : १५०-२००, भुईमूग शेंग : ५००-१०००, मटार : स्थानिक मटार : परराज्य : ८००-९००, पावटा : ६००-६५०, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : १००-२००, सुरण : १००-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.
Web Summary : Pune's vegetable market sees prices dip due to heat. Demand is down, causing a 10-20% drop in rates for some vegetables. Arrivals from other states continue.
Web Summary : गर्मी के कारण पुणे की सब्जी मंडी में कीमतें गिरीं। मांग कम होने से कुछ सब्जियों की दरों में 10-20% की गिरावट आई। अन्य राज्यों से आवक जारी है।