शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका शहरात ६८ ठिकाणी करून देणार भाजीपाला उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 19:56 IST

पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये नागरिक सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाला खरेदी करू शकणार

ठळक मुद्देआठवडे बाजार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनाराज्यभरात कलम १४४ लागू करण्यात आले असून जमावबंदी घोषित

पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यातुन संसर्ग वाढण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने नागरिकांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध व्हावा याकरिता आठवडे बाजाराच्या धर्तीवर ६८ ठिकाणी भाजीपाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये नागरिक सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाला खरेदी करू शकणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. शहरात कोरोनाचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व गदीर्ची ठिकाणे बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्यभरात कलम १४४ लागू करण्यात आले असून जमावबंदी घोषित करण्यात आलेली आहे.  त्यामुळे ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र असणे धोकादायक आहे. त्याअनुषंगाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात भरविण्यात येणारे शेतकरी आठवडे बाजार सुरू ठेवण्यात येणार आहेत. या बाजारांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सामाजिक अंतर (सोशल डिस्टनसिंग) ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.या कालावधीत नागरिकांना दैनंदिन वापरासाठी भाजीपाला घरपोहोच तसेच घराजवळील ठिकाणी उपलब्ध होण्याकरिता क्षेत्रिय कार्यालयनिहाय शेतकरी संयोजकांची यादी तयार करण्यात आलेली आहे.नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन वापरासाठी आवश्यक त्या भाजीपाल्याची मागणी या शेतकरी संयोजकांकडे मोबाईलद्वारे संपर्क काळविल्यास घरपोहोच अथवा घराजवळील ठिकाणी पुरविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या वेबसाईटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.हा भाजीपाला हा थेट शेतकऱ्यांकडून उपलब्ध होत असल्याने दराबाबत व गुणवतेची जबाबदारी महानगरपालिकेची राहणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याठिकाणी भाजी खरेदीला जाताना दोन व्यक्तींमध्ये तसेच विक्रेता व ग्राहकांनी योग्य अंतर ठेवावे असे आवाहन आयुक्त गायकवाड यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेvegetableभाज्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरी