शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

"ही बघा पावती! मी हेक्टर देत होतो, पण त्यांनी फॉर्च्युनरच मागितली"; वैष्णवीच्या वडिलांनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:20 IST

आम्ही एमजी हेक्टर ही गाडी बुक केली होती, त्यांनी वादावादी केली, मला फॉर्च्युनर नाही दिली तर मी यांची हेक्टर पेटवून देईन

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पत्नी, सासू, नणंद सासरा दीर यांना काल शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी  शिवाजीनगर कोर्टात हगवणे यांच्या वकिलांनी अजब युक्तिवाद केला. आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्चुनरसाठी कशाला छळ करू असं म्हणत वकिलांनी सवाल उपस्थित केला. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते‌. ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा असल्याचे त्यांनी युक्तिवादात सांगितले. वैष्णवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती. तीचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते. अशी अजब वक्तव्य यावेळी वकिलांनी केली. त्यानंतर आज वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेत वकिलांच्या वक्तव्याचा खुलासा केला आहे.  

फॉर्च्युनर दिली नाही तर आम्ही लग्न मोडू अशी धमकी हगवणे यांनी आम्हाला दिली होती. त्यामुळे आम्ही फॉर्च्युनर घेऊन दिली आणि मुलीचे लग्न लावून दिले. फॉर्च्यूनर देण्याअगोदर मी एमजी हेक्टर ही गाडी बुक केली होती. त्यांनी वादावादी केली. मला फॉर्च्युनर नाही दिली तर मी यांची हेक्टर पेटवून देईन असं सांगण्यात आलं म्हणून फॉर्च्युनर दिली. आरोपीकडे 5 कोटीच्या गाड्या नाहीत. याच्याकडे एकच गाडी  मी दिलेली आहे. गाडी दिली नाही तर लग्न मोडेल अशी धमकी दिली होती. अगोदर दोन लग्न मोडली होती. म्हणून माघार घेऊन आम्ही ही गाडी त्या आरोपीला दिली. 

मोबाईल काढून घ्यायचा तर दिला कशाला  

आरोपीचे वकील बोलले ते मी आणि समाजाने ऐकले. ते चुकीचे बोलले. असे एखाद्या मुलीच्या चारित्र्यावर बोलले हे चुकीचे आहेत. त्यांनी केलेले कृत्य आणि माझ्या मुलीचा बळी याला वेगळी कलाटणी द्यायची आहे. मोबाईल चॅटिंग बाबत आम्हाला कल्पना दिली नव्हती. कुठलीही माहिती दिली नव्हती. माझ्या मुलीवर चारित्र्याचा संशय घेतला आहे. माझ्या मुलीचा मोबाईल काढून घेतला असं ते म्हणाले. मोबाईल काढून घ्यायचा असेल तर मी तिला मोबाईल दिला कशाला? आरोपी जावई याला १ लाख ५२ हजाराचा मोबाईल दिला. त्यांनी मागितला त्यानुसार आम्ही दिला. विकत घेतलेला मोबाईलची रिसीट दाखवली. आजही मी आरोपीला दिलेल्या मोबाईलचे हप्ते भरत आहे. 

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPoliceपोलिसCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी