शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

Vaishnavi Hagawane Death Case : निर्लज्जपणाचा कळस! फरार असताना मटणावर ताव मारताना दिसले हगवणे पिता-पुत्र; सीसीटीव्ही फुटेजच आलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 08:17 IST

वैष्णवी हगवणे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी पती, सासू, नणंद, सासरा आणि दीर यांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता.

किरण शिंदे 

पुणेराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार होते. मात्र, पुणे पोलिसांनी शुक्रवारी पहाटे दोघांनाही अटक केली असून, अटकेपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हे दोघे तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये मस्तपैकी मटणावर ताव मारताना दिसत आहेत. त्यामुळे आरोपी फरार असतानाही मोकाटपणे फिरत होते, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.

वैष्णवी हगवणे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी पती, सासू, नणंद, सासरा आणि दीर यांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे, जमीन खरेदीसाठी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर हा छळ सुरू झाला होता, असेही कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. 

Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई

या प्रकरणात पोलिसांनी आधीच पती, सासू आणि नणंद यांना अटक केली होती. मात्र, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे गेल्या सात दिवसांपासून फरार होते. दरम्यान, शुक्रवारी पहाटे ४:३० च्या सुमारास पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात हे दोघे अखेर जेरबंद झाले.

अटकपूर्वीचा या दोघांचा जेवणाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आरोपींनी फरारी काळात आरामात हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतल्याचे त्यात स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. सध्या दोघांची कसून चौकशी सुरू असून, वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार ठरवून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

सासरा, दीर पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज (गुरुवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणात वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.

टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी