शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - सोलापूर महामार्गावर सहजपूर फाट्याजवळ अपघात ; दोन ठार,  एक गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 21:42 IST

भीषण अपघातात इको कारचा चक्काचूर

यवत : पुणे - सोलापूर महामार्गावर सहजपूर फाटा (ता.दौंड) नजीक अनेक वाहने एकमेकांवर धडकली. अपघातात एका मारुती इको कारचा चक्काचूर होऊन दोघे मृत्युमुखी पडले. एक गंभीर जखमी झाला आहे. अपघात शनिवारी (दि. ७) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला.
   ट्रॅक्टर चालक भाऊसाहेब रणजित चव्हाण (वय -२२, रा.अनुराज शुगर्स कारखान्याजवळ, यवत, ता.दौंड) याने यवत पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन उरुळी कांचन येथून ऊस आणण्यासाठी जात होता. पुणे- सोलापूर महामार्गावरील सहजपूर फाटा येथे आला असता,पाठीमागून येणाऱ्या टँकरने (एम.एच.४३ ,वाय - ७३९३) जोरदार धडक दिली. धडकेमुळे ट्रॅक्टरचे तोंड सहजपूर फाटा बाजूकडे वळले आणि पुण्याकडून येणारा कंटेनर (क्र. एम.एच.१२, एल.टी.४१७८) याची धडक ट्रॅक्टरला बसली. ट्रॅक्टरची पुढची दोन्ही चाके तुटून कंटेनर जागीच थांबला. यानंतर कंटेनरच्या पाठीमागून येणारी इको कार कंटेनरवर धडकली. याचवेळी पाठीमागून अज्ञात ट्रकने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. कारचा दोन्ही वाहनांमध्ये चक्काचूर झाला. कारला धडक दिल्यानंतर ट्रक घटनास्थळी न थांबता निघून गेला. मात्र जाताना ट्रक मागे घेत असताना सरकारी वाहन महिंद्रा गाडी (क्र. एम.एच.१२, एन यू.३५०८) या गाडीला समोरून धडक देऊन पळून गेला.      

   भीषण अपघातात इको कारचा चक्काचूर झाल्याने अपघातात ओंकार आण्णा गवंड (वय- ३० , रा.रावणगाव, ता.दौंड) व वीरेंद्रसिह  यादव (रा.कुरकुंभ, ता.दौंड) हे जागीच मृत्युमुखी पडले. कैलास रामचंद्र भागवत हे गंभीर जखमी झाले. अपघात ग्रस्तांना पत्रा तोडून बाहेर काढण्यात आले.
 

टॅग्स :daund-acदौंडAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस