शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
3
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
4
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
5
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
6
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
7
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
8
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
9
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
10
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
11
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
12
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
13
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
14
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
15
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
16
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
17
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
18
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
19
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
20
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचे नियंत्रण सुटले; सिग्नलवर थांबलेल्या ६ वाहनांना धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, नवले पुलावर भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 09:55 IST

प्रशासनाने कितीही उपाययोजना केल्या असल्या, तरी अपघातांची मालिका थांबत नसल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे

धायरी: पुण्यातील सातत्याने अपघाताचे केंद्र ठरत असलेल्या नवले पूल परिसरात आज (शुक्रवार) सकाळी काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. कात्रज चौकाकडून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने सिग्नलला थांबलेल्या वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण विचित्र अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, पाच चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

​आज शुक्रवार, दि. १३ मार्च रोजी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास नवले पुलाखालील चौकात नेहमीप्रमाणे वाहने सिग्नल सुटण्याची वाट पाहत थांबली होती. याच वेळी कात्रज बोगद्याच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. उतारावरून वेगात असलेल्या या ट्रकने समोर थांबलेल्या वाहनांना अक्षरशः उडवत नेले.

​ट्रकने सर्वात आधी एका दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
​दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रक एवढ्यावरच थांबला नाही, त्याने पुढे असलेल्या पाच चारचाकी वाहनांना एकापाठोपाठ एक धडक दिली. यामध्ये या सर्व वाहनांचा मोठा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ माजली. रस्त्यावर वाहनांचे अवशेष आणि गर्दी जमल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

​घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पथक आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मृत दुचाकीस्वाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. नवले पूल परिसरातील तीव्र उतार आणि वाहनांचा वेग यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. प्रशासनाने कितीही उपाययोजना केल्या असल्या, तरी अपघातांची मालिका थांबत नसल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Truck loses control on Navale Bridge; collision kills biker.

Web Summary : A speeding truck on Navale Bridge, Pune, hit vehicles stopped at a signal, killing a biker and damaging several cars. Police are investigating the accident, a frequent occurrence due to the steep slope. Locals express anger over continued accidents.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातcarकारbikeबाईकPoliceपोलिसroad safetyरस्ते सुरक्षाDeathमृत्यू