पुणे नाशिक महामार्गावर तीन गाड्यांच्या अपघात; एसटीतील ५ प्रवासी जखमी, इतर थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 08:29 PM2023-07-07T20:29:00+5:302023-07-07T20:29:52+5:30

पुणे नाशिक महामार्गावर वारंवार होतायेत अपघात, प्रशासन जीव जाण्याची वाट बघतंय का? नागरिकांचा सवाल

Three car accident on Pune Nashik highway 5 passengers of ST injured others narrowly escaped | पुणे नाशिक महामार्गावर तीन गाड्यांच्या अपघात; एसटीतील ५ प्रवासी जखमी, इतर थोडक्यात बचावले

पुणे नाशिक महामार्गावर तीन गाड्यांच्या अपघात; एसटीतील ५ प्रवासी जखमी, इतर थोडक्यात बचावले

googlenewsNext

मंचर: एसटी बस व मालट्रक, आयशर टेम्पो या तीन गाड्यांच्या अपघातात एसटीमधील पाच प्रवाशी जखमी झाले आहेत. इतर प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. हा अपघातपुणे नाशिक महामार्गावर अवसरी खुर्द गावाच्या हद्दीतील कात्रज डेअरी सायंकाळी झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर एसटी आगाराची एसटी बस क्रमांक ही पुणे येथून नाशिक बाजूकडे चालली होती. एसटीमध्ये 40 प्रवासी होते. त्याचवेळी नाशिक बाजूकडून मालट्रक व आयशर टेम्पो ही दोन्ही वाहने पुणे बाजूकडे चालली होती. पुणे नाशिक महामार्गावर अवसरी फाट्याच्या पुढे कात्रजसमोर एसटी व दोन्ही वाहनांची धडक झाली. अपघातानंतर प्रवाशांनी आरडाओरडा केला. त्यानंतर एसटी बस दोनशे मीटर अंतरावर जाऊन थांबली. या अपघातात एसटीतील पाच प्रवाशी जखमी झाले आहेत. 

एसटीतील सचिन बाबासाहेब फापाळे (वय 19 रा. गारगुंडी पारनेर) याच्या तोंडाला गंभीर जखमा झाल्या आहेत. गौरव बारणे यांच्या रुग्णवाहिकेतून जखमीला मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. फापाळे याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. शुभम संजय नाईक (वय २०,रा. संगमनेर), विनायक देवदत्त भारमळ ( वय १८ रा.नारायणगाव), सायली बेल्हेकर (वय ३५ रा.इंदिरानगर- निघोटवाडी मंचर) हे सुद्धा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघातातील एका जखमीचे नाव समजले नाही. अपघातात एसटी चालकाच्या बाजूचे मागचे चाकाचे नुकसान झाले आहे. अपघातातील जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी मंचर येथील रामा ऑटोबाईलचे अरविंद वळसे पाटील यांनी सहकार्य केले. एसटी चालक एस बी आंधळे यांच्या चुकीमुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. दरम्यान काही रुग्णवाहिका चालकांनी जखमींना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. जखमी रुग्णांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज असतानाही रुग्णांना खाजगी दवाखान्यात नेल्याने नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पुणे नाशिक महामार्गावर वारंवार छोटे मोठे प्रघात घडू लागले आहेत. परंतु त्यामध्ये नागरिक जखमी होत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासन नागरिकांचा जीव जाण्याची वाट बघतंय का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. 

Web Title: Three car accident on Pune Nashik highway 5 passengers of ST injured others narrowly escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.