Three arrested for assault with minor cause | किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला करणा-या तिघांना अटक
किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला करणा-या तिघांना अटक

 

पुणे : लाईट बंद का केला नाही म्हणून लाकडी बांबू, लोखंडी सळईच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करुन दोघांना गंभीर जखमी करणा-या तिघांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे़ निवृत्ती किसन शिलीमकर (वय ३०, रा. कोथरूड), व्यंकटेश शिवशंकर अनपुर (वय ३१), लहु यादव शेडगे (वय २३,  दोघेही रा़ वारजे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत़ शंकर हनुमंत धोत्रे (वय ३७,रा. वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये धोत्रे यांचा चुलत मेव्हणा राजू बजरंग कुसाळकर (वय ३८,रा. वारजे) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला ३४ टाके पडले आहेत. तर शंकर धोत्रेही जखमी झाले आहेत. हा प्रकार वारजे येथील
गोकुळनगर येथे  मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडला आहे.

धोत्रे हे कॅब चालविण्याचा व्यावसाय करतात. ते घरी जातअसताना, वाटेत त्यांचे चुलत मेव्हणे राजू एकटेच बसलेले दिसले़ धोत्रे यांनी गाडी चालू ठेवून खाली आले आणि दोघे बोलत थांबले होते. यावेळी पुढे काही अंतरावर उभा असलेल्या एकाने त्यांना शिवीगाळ करत लाईट बंद करण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी घाबरून जाऊन लाईट बंद केली. तरी देखील आरोपीने लाकडी बांबूने राजू यांच्या डोक्यात जोरात फटके मारले. रक्तबंबाळ अवस्थेत राजू खाली पडले. त्यानंतर दुसºया एकाने देखील लोखंडी सळईने छातीवर व डोक्यात मारहाण केली. हा सर्व प्रकार सुरू असताना धोत्रे यांनी धावत गाडीतून मेव्हण्याला सोडवण्यासाठी गेले असताना त्यांना देखील मारहाण केली. त्यांच्या गाडीचीकाच फोडली व ते पळून गेले़ राजू कुसाळकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले़ दारू पिण्यासाठी आरोपी त्या ठिकाणी बसले होते. गाडीची लाईट अंगावर पडल्यामुळे हा प्रकार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे़

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असली तरी तिघांनी केलेल्या हल्ल्यात राजू कुसाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत़ त्यांच्या डोक्यात ३४ टाके पडले आहेत़ असे असतानाही पोलिसांनी ३०७ खुनाचा प्रयत्न चे कलम न लावता ३२६, ३४१, ३२३, ५०४, ४२७ अशी किरकोळ कलमांखाली गुन्हा दाखल केला असल्याचे कुसाळकर यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे़ स्थानिक परिसरात राहणाºया नागरिकांनी सांगितले की, मागील अनेक दिवसापासून या परिसरात सराईतांचा वावर वारला असून, किरकोळ कारणातून नागरिकांना विनाकारण मारहाण केली जात आहे. तसेच दारुड्यांनी उच्छाद मांडला आहे़ परिसरातील लोकांवर अचानक हल्ला करणे, दारु राडा करणे, वाहनांची तोडफोड करणे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी या गुन्हेगारांवर कारवाई
करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत.


Web Title: Three arrested for assault with minor cause
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.