तरुणाने पैसे देणं केलं बंद; ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीने 'तो' व्हिडिओ एडिट करून केला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 12:40 IST2023-05-06T12:40:15+5:302023-05-06T12:40:45+5:30

दोघांची ओळख झाल्यावर तरुणीने शारीरिक संबंधांचा व्हिडीओ नकळत तयार करून तरुणाला ब्लॅकमेल करत पैसेही उकळण्यास सुरुवात केली होती

The young man stopped paying The blackmailing young woman edited the video and made it viral | तरुणाने पैसे देणं केलं बंद; ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीने 'तो' व्हिडिओ एडिट करून केला व्हायरल

तरुणाने पैसे देणं केलं बंद; ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीने 'तो' व्हिडिओ एडिट करून केला व्हायरल

वाघोली : सोशल मीडियातून झालेल्या ओळखीनंतर आलेल्या शारीरिक संबंधांचा व्हिडीओ व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी खराडी येथील तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाघोली येथील तरुणाने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील लोहगाव रोडवरील एका सोसायटीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या एका तरुणाची सोशल मीडियावर ओळख झाली होती. ओळखीनंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले होते. तरुणीने संबंधांचा नकळत व्हिडीओ तयार करून तरुणाला ब्लॅकमेल करून पैसेही उकळले. तरुणाकडून पैसे देणे बंद झाल्याने तरुणीने स्वतःचा भाग एडिट करून तरुणाचाच शारीरिक संबंधांचा भाग दिसेल असा व्हिडीओ तयार करून तरुणाच्या नातेवाइकांना पाठविला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस करत आहेत.

Web Title: The young man stopped paying The blackmailing young woman edited the video and made it viral