शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा संयम सुटला, नीट परीक्षा पुढे ढकलल्याने तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 18:22 IST

केंद्र शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमाचे नवे शैक्षणिक वर्ष जानेवारीपासून सुरू करावे.

ठळक मुद्देपरीक्षांच्या तारखा सतत बदलत असल्यामुळे विद्यार्थी तणावाखाली नीट परीक्षेच्या तयारीसाठी घेतल्या जाणाऱ्या सराव परीक्षांना सुध्दा विद्यार्थ्यांकडून कमी प्रतिसाद

पुणे: वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण असून अनेकांचा परीक्षेला सामोर जाण्याचा संयमही आता सुटला आहे.त्यामुळे केंद्र शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष जानेवारी 2021 पासूनच सुरू केले तर उचित ठरेल,असे मत प्रवेश पूर्व परीक्षांच्या अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे.       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंजिनिअरिंग व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या  जेईई व नीट परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा आता 13 सप्टेबर रोजी घेतली जाणार आहे. कोरोनामुळे जुलै महिन्यात घेतली जाणारी नीट परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी नाराज आहेत. नीटच्या तयारीसाठी अनेक विद्यार्थ्यांनी एप्रिल 2019 पासून तयारी सुरू केली. वर्ष उलटून गेले तरी परीक्षा झाली नाही. त्यामुळे एकाच परीक्षेचा आणखी किती दिवस अभ्यास करायचा, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक व डीपरचे सचिव हरिष बुटले म्हणाले, इंजिनिअरिंग मेडिकल सारख्या प्रवेश पूर्व परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सय्यम पूर्णपणे सुटत चालला आहे. परीक्षांच्या तारखा सतत बदलत असल्यामुळे विद्यार्थी तणावाखाली आहेत.सप्टेबरम महिन्यात सुध्दा परीक्षा होणार की नाही? याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी तणावाखाली न ठेवता जानेवारी 2021 पासूनच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू केलेले योग्य होईल.           प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक दिलीप शहा म्हणाले,नीट परीक्षेच्या तयारीसाठी घेतल्या जाणाऱ्या सराव परीक्षांना सुध्दा विद्यार्थ्यांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. अनेक विद्यार्थी एका वषार्पेक्षा अधिक कालावधीपासून अभ्यास करत आहेत.परंतु,पूर्वी सराव परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी आता 620 पैकी 200 ते 300 गुण मिळत आहेत. यावरून विद्यार्थ्यांचा संयम सुटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्षातच बदल करणे उचित ठरेल.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय