विद्यार्थ्याला शिवीगाळ, मारहाण; आयएलएस लॉ कॉलेजच्या वसतिगृहात रॅगिंग, पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:48 IST2026-04-27T11:47:57+5:302026-04-27T11:48:07+5:30

महाविद्यालयीन वसतिगृहात रॅगिंगच्या घटना पुन्हा समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Student abused, beaten; Ragging in ILS Law College hostel, case registered against five students | विद्यार्थ्याला शिवीगाळ, मारहाण; आयएलएस लॉ कॉलेजच्या वसतिगृहात रॅगिंग, पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

विद्यार्थ्याला शिवीगाळ, मारहाण; आयएलएस लॉ कॉलेजच्या वसतिगृहात रॅगिंग, पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

पुणे : कायद्याचे शिक्षण देणाऱ्या आयएलएस लॉ कॉलेज तसेच कॉलेजमधील मुलांच्या वसतिगृहात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्रास देत रॅगिंग केल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये पाच विद्यार्थ्यांचा समावेश असून, महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत एका ३५ वर्षीय विद्यार्थ्याने फिर्याद दिली आहे. आदित्य सिंग (वय २०), सुमीत गायकवाड (वय २०), राजवंश देशमुख (वय २०), स्वराज गायकवाड (वय २०) आणि उज्ज्वल राज (वय २०) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विद्यार्थी हा आयएलएस लॉ कॉलेजमध्ये एलएलबी द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून तो लॉ कॉलेज रोडवरील मुलांच्या वसतिगृहात राहतो. त्याच वसतिगृहात राहणाऱ्या आणि द्वितीय वर्षात शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांनी त्याला शिवीगाळ तसेच मानसिक त्रास देत रॅगिंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्याने काही महिन्यांपूर्वी डेक्कन पोलिसांकडे लेखी अर्ज दिला होता. या अर्जाची पोलिसांनी चौकशी केली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर या प्रकरणात अखेर महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संबंधित विद्यार्थ्याने याबाबत महाविद्यालय प्रशासनाकडेही अर्ज दिला होता. त्यावर महाविद्यालयाने नेमकी कोणती कारवाई केली, याची माहिती घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. महाविद्यालयीन वसतिगृहात रॅगिंगच्या घटना पुन्हा समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून, उपनिरीक्षक पवार पुढील तपास करत आहेत.

Web Title : आईएलएस लॉ कॉलेज में रैगिंग: छात्र से मारपीट, पांच पर मामला दर्ज।

Web Summary : पुणे के आईएलएस लॉ कॉलेज के छात्रावास में एक छात्र के साथ रैगिंग के आरोप में पांच छात्रों के खिलाफ मामला दर्ज। पीड़ित को कथित तौर पर प्रताड़ित और गाली दी गई। शिकायत के बाद पुलिस जांच कर रही है, जिससे छात्रों की सुरक्षा पर चिंता बढ़ गई है।

Web Title : Ragging at ILS Law College: Student assaulted, five booked.

Web Summary : Five students booked for ragging a second-year student at ILS Law College hostel in Pune. The victim was allegedly harassed and abused. Police are investigating after a formal complaint was lodged, raising concerns about student safety.