शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

रामटेकडी प्रकल्पाविरोधात कचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 2:44 PM

रामटेकडी कचरा प्रकल्पाच्या विरोधात भाजपा वगळता सर्व पक्षीय व कचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्यावतीने आज मोर्चाकडून महापौर, महापालिका, मुख्यमंत्र्यांचा निषेध केला.

ठळक मुद्देहडपसर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणावर धोका पुणे शहरात एकूण १६०० टन कचरा दररोज तयार होतो, त्यापैकी १०० टन कचरा हा वडगाव व बाणेर येथील कचरा प्रकल्पात जिरवला जातो पालिका आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.

हडपसर : रामटेकडी येथील हडपसर औद्योगिक वसाहतीमधील पुणे महानगरपालिका १३ एकर जागेवर कचरा प्रकल्प सुरु करण्याचा घाट घालत आहे. त्या प्रकल्पाच्या विरोधात भाजपा वगळता सर्व पक्षीय व कचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्यावतीने आज मोर्चाकडून महापौर, महापालिका, मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. या मोर्च्यात हजारो नागरिक नागरिक उपस्थित होते.यापूर्वी हडपसर मध्ये हंजर बायोटेक, दिशा वेस्ट मॅनेजमेन्ट, अजिंक्य, रोकेम, जनावरे जाळण्याचा कारकस प्रकल्प, कँटोन्मेंट कचरा प्रकल्प इ प्रकल्प हडपसर परिसरात असून गेली अनेक वर्षे हडपसरचे नागरिक हा कचरा सहन करावा लागत आहे.पुणे शहरात एकूण १६०० टन कचरा दररोज तयार होतो, त्यापैकी १०० टन कचरा हा वडगाव व बाणेर येथील कचरा प्रकल्पात जिरवला जातो व उर्वरित १५०० टन कचरा हा हडपसर परिसरात येतो आणि आणखी कचरा हडपसर परिसरात आल्यास त्यामुळे हडपसर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होऊ शकतो. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, महादेव बाबर, विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, नगरसेवक योगेश ससाणे, प्रमोद भानगिरे, बंडू गायकवाड, नंदा लोणकर, अशोक कांबळे, आनंद अलकुंटे, विजय देशमुख, सुनील बनकर, वैभव माने  यांच्या सह येथील हजारो नागरिक  या मोर्चात सहभागी झाले होते.

या  प्रकल्पांमुळे संपूर्ण हडपसर परिसरातील नागरिकांना डास, माशा, दुर्गंधी याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातच भर म्हणून आणखी १३ एकरावर नवीन प्रकल्प सुरु केल्यास हडपसरकरांच्या आरोग्यास आणखी प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो. हडपसरकरांनी सर्व पुण्याचा कचरा आणि कचºयाचा त्रास सहन करण्याचा काही ठेका घेतलेला नाही. यापूर्वी कारकस प्रकल्प, गुरांचे गोठे, डुकरांसाठीचे पुनर्वसन हे हडपसर परिसरात करण्यात आलेले आहे. याचा अर्थ पुणे शहरातील संपूर्ण वेस्ट मटेरियल फक्त आणि फक्त हडपसरच्या माथी मारण्याचा जो घाट प्रशासनाने आणि भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधाºयांनी घातलेला आहे. याबाबत येथील भाजपा वगळता सर्व नगरसेवकांनी विरोध केला आहे. अनेक दिवसाच्या विरोधानंतर ही पालिका हा प्रकल्प करण्याच्या तयारीत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ दिला जाणार नाही. त्यासाठी आमच्यावर कोणतेही खटले दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. पालिकेने या प्रकल्पाचा हट्टाहास धरला तर आम्ही कोर्टात जाऊ, अशी भूमिका घेतली असल्याचे कचरा हटाव संघर्ष समितीने घेतली.आंदोलनकर्त्यांना प्रकल्पाच्या जागेपासून १०० मीटर अंतरावरच अडवण्यात आले. काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे पालिका आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी निषेध व्यक्त करीत आपली मनोगत व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाagitationआंदोलन