विसर्जन मिरवणुकीतील पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:04 AM2017-09-05T01:04:27+5:302017-09-05T01:04:50+5:30

नाशिक : श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्ताचे नियोजन केले असून, शहरात सुमारे सव्वादोन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.

Police settlement of immersion procession | विसर्जन मिरवणुकीतील पोलीस बंदोबस्त

विसर्जन मिरवणुकीतील पोलीस बंदोबस्त

Next

नाशिक : श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्ताचे नियोजन केले असून, शहरात सुमारे सव्वादोन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.
पोलीस आयुक्त - १, पोलीस उपआयुक्त - ४, सहायक पोलीस आयुक्त - ८, पोलीस निरीक्षक - ५०, सहायक पोलीस निरीक्षक - १००, पोलीस कर्मचारी - १०००, होमगार्ड - ६००, एसआरपी - १ प्लाटून, दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक तैनात करण्यात आले आहे.
शहरातील वाकडी बारवपासून निघणाºया मुख्य मिरवणुकीसाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ या मिरवणुकीत महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडू नये यासाठी महिला पोलिसांचे एक स्वतंत्र पथक व डीबीचे कर्मचारी तसेच साध्या वेशातील पोलीस कर्मचारी मिरवणूक मार्गावर तैनात असणार आहेत.
दरम्यान, डीजेवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविली असल्याने विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट होण्याची दाट शक्यता आहे. न्यायालयाने डीजेवर बंदी आणल्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयास स्थगिती मिळाल्याने डीजेचा वापर होण्याची शक्यता आहे. असे असले तरी, आवाजाचा मर्यादित डेसिबल ओलांडल्यास संबंधितांवर कारवाई होणारच आहे त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना मिरवणुकीत डीजेचा आवाज मर्यादितच ठेवावा लागणार आहे.

 

Web Title: Police settlement of immersion procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.