+
लाइव न्यूज़
  • 03:46 PM

    नाशिक : सोनसाखळी चोरणाऱ्या दोन संशयितांना पंचवटी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तीन लाख रुपये किंमतीचे तब्बल दहा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

  • 03:44 PM

    मुंबई विद्यापीठातील निकाल रखडल्याचं प्रकरण - निकाल उशिरा लागला तरी प्रवेशाला अडचण नाही - विनोद तावडे

  • 03:33 PM

    वाशिम - शहरातील ड्रिमलँड सिटीमधील बंडू गांजरे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज केला लंपास.

  • 03:09 PM

    डोंबिवलीत भरदिवसा रिक्षावाल्याकडून महिलेचा अपहरणाचा प्रयत्न, मानपाडा पोलीस स्थानक परिसरातील घटना.

  • 03:07 PM

    मुंबई: मंत्रिमंडळातील जागेसंदर्भात भूमिका जाहीर करावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सरकारला अल्टिमेटम.

  • 02:47 PM

    नागपूर: मोनिका किरणापूरे हत्या प्रकरण. हायकोर्टाकडून चारही आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम. सत्र न्यायालयाने सुनावली होती जन्मठेपेची शिक्षा.

  • 02:31 PM

    कल्याण: रस्त्यावरी खड्यांमुळे फेब्रुवारी महिन्यात तरूणाच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल. पीडब्ल्यूडी आणि कॉन्ट्रॅक्टरविरोधात गुन्हा दाखल. सात महिने केला पाठपुरावा.

  • 02:24 PM

    मुंबई- शिवसेना राज्य कार्यकारिणीची बैठक सुरू. बैठकीत मंत्री, जिल्हाध्यक्ष आरोप-प्रत्यारोप- सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंसमोरच खडाजंगी झाल्याची माहिती.

  • 02:20 PM

    'नारायण राणे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे', महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं कोल्हापूरमध्ये वक्तव्य.

  • 02:18 PM

    अमरावती: कान्होली येथील ज्ञानेश्वर मोतीराम सोळंके या शेतकऱ्याची आत्महत्या. गळफास घेऊन केली आत्महत्या. शेतकऱ्याच्या डोक्यावर 60 हजार कर्ज असल्याची माहिती.

  • 02:01 PM

    विदर्भाप्रमाणे मराठवाडयातही पावासची स्थिती बिकट, नागपूर वेधशाळेची माहिती.

  • 01:52 PM

    सांगली- सदाभाऊ खोतांचं राजू शेट्टींना खुलं आव्हान. हातकंणगले मतदार संघाबाहेर निवडणूक लढवा. मतदारसंघाबाहेर लढा म्हणजे तुमची ताकद कळेल. शेट्टींची आत्मक्लेश नाही तर क्लेश यात्रा होती.

  • 01:48 PM

    गोरखपूर हॉस्पिटलमध्ये झालेल्या लहान मुलांच्या मृत्यू प्रकरणी उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी चौकशीची मागणी केली आहे.

  • 01:44 PM

    परभणी : पालम तालुक्यातील शेतकऱ्यांचा दुष्काळ जाहीर करून पिण्याचे पाणी व चारा छावणीची व्यवस्था करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा. वाळलेली पिके हातात घेऊन शेतकरी सहभागी.

  • 01:23 PM

    गोरखपूर मुलांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करा; अलाहाबाद उच्च न्यायायाचे उत्तर प्रदेश सरकारला आदेश, पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होणार.

All post in लाइव न्यूज़