Live Marathi News

 • 10:11 PM

  कुडाळ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पालघर मध्ये येऊन प्रचार केला तरी हिंदूची मते बदलणार नाहीत - राज ठाकरे

 • 09:43 PM

  हिमाचल प्रदेश - शिमलामध्ये संध्याकाळी 6.05 च्या सुमारास जाणवले सौम्य भूकंपाचे धक्के, भूकंपाची तीव्रता 3.6 मॅग्निट्युट

 • 08:05 PM

  जम्मू - पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, हिरानगर, सांबा, रामगड, अरनिया आणि सुचेतगड परिसरात गोळीबार, बीएसएफकडून प्रत्युत्तर

 • 07:32 PM

  कर्नाटक: काँग्रेस नेते जी. परमेश्वरा उद्या घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

 • 07:17 PM

  अमरावती - गुरुदेवनगरात भारतीय सैनिकाची गळफास घेऊन आत्महत्या

 • 07:07 PM

  आम्ही मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत निर्णय घेतला आहे, विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड 25 मे रोजी होईल - एच.डी. कुमारस्वामी

 • 06:35 PM

  IPL 2018 : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला केले फलंदाजीसाठी पाचारण

 • 06:22 PM

  ओदिशा: हेमगिर वनक्षेत्रातील कॅमेऱ्यांमध्ये दिसला काळ्या रंगाचा बिबट्या

 • 06:13 PM

  गडचिरोली - गावकऱ्यांनी जाळले नक्षलवाद्यांचे बॅनर, बंदच्या आवाहनामुळे वाहतुकीला अडथळे

 • 05:41 PM

  सावंतवाडी - कोकण दौऱ्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचेसावंतवाडीत आगमन, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू

 • 05:30 PM

  यवतमाळ - आलिशान वाहनातून होणारी जनावरांची तस्करी उघड. राष्ट्रीय महामार्गावर उमरी येथे स्कॉर्पिओ कारमधून सहा जनावरांची सुटका

 • 05:26 PM

  मुंबई - जे.जे रुग्णालयातील संपकर्त्या डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य, मागण्या मान्य झाल्यानंतर चार दिवसांनी संप मागे

 • 05:24 PM

  मुंबई - जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा संप अखेर मिटला

 • 04:34 PM

  राजस्थान: जोधपूरमध्ये तीन मजली इमारत कोसळली; बचावकार्य सुरू

 • 04:21 PM

  बीड - बापुराव लांब या वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू. केज येथील आठवडी बाजारातील घटना

 • 04:07 PM

  मुंबई - आझाद मैदानात धनगर आरक्षणासाठी ढोल गर्जना आंदोलनाला सुरूवात

 • 04:03 PM

  मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांच्याकडून दिग्विजय सिंह यांची समन्वय समितीच्या अध्यक्षपदी निवड

 • 04:02 PM

  जेजेतील डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशीही कायम. मार्डचे डॉक्टर व गिरिश महाजन यांच्यात तातडीची बैठक सुरू. संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक.

 • 03:34 PM

  आसाम: उल्फा संघटनेच्या एका दहशतवाद्याला लष्कराकडून अटक

 • 02:14 PM

  अहमदनगर : महापालिकेत शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखाचा महापौरांसमोर धिंगाणा, कचरा डेपोतील धूर कमी करण्यासाठी अांदोलन

 • 01:51 PM

  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची आज संध्याकाळी पत्रकार परिषद.

 • 01:44 PM

  ठाणे- अमरज्ञान कमर्शिअल कॉम्प्लेक्सच्या दुस-या मजल्यावरील ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किटनं लागली आग

 • 01:41 PM

  आयसिसचं सदस्यत्व स्वीकारणाऱ्या जिहादी व्यक्तीला इराक कोर्टानं सुनावली फाशी

 • 01:24 PM

  नवी दिल्ली- महिला पत्रकारासंदर्भात आक्षेपार्ह विधान केलेला भाजपा नेता एस. व्ही. शेखर यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयानं 1 जूनपर्यंत दिली स्थगिती

 • 01:20 PM

  शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रकृतीत बिघाड, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात जैस्वाल यांच्यावर उपचार.

 • 01:18 PM

  पाकिस्तानकडून आर. एस. पुरा सेक्टरमध्ये गोळीबार; अनेक घरांचं मोठं नुकसान

 • 01:16 PM

  सोलापूर : कडलास (ता़ सांगोला) येथे उष्माघाताने ५८ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू

 • 12:56 PM

  मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाची तातडीची बैठक, निपाह विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन बोलावली बैठक.

 • 12:26 PM

  ठाणे : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची तीव्र निदर्शने.

 • 12:25 PM

  सोलापूर : पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात बहुजन समाज पार्टीचे आंदोलन.

 • 12:18 PM

  परभणी : आरोग्य उपकेंद्रात कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कक्षात भारस्वाडा ग्रामस्थांचे हलगी वाजवून आंदोलन.

 • 12:09 PM

  कर्नाटक: विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचा असणार, संध्याकाळपर्यंत नाव जाहीर होणार- सूत्र

 • 12:08 PM

  नवी दिल्ली- तेल कंपन्यांसोबत आज सरकारची बैठक, इंधनाच्या वाढत्या किमतीबाबत सरकार चिंतेत

 • 11:57 AM

  मुंबई- मार्डचे डॉक्टर अजूनही संपावर ठाम, सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्णय.निवासी डॉक्टरांच्या बैठकीत निर्णय.

 • 11:26 AM

  उत्तर प्रदेश- आग्र्यात माकडांच्या हल्ल्यात दोन प्रवासी जखमी

 • 11:19 AM

  चौथ्या वर्षपूर्तीनंतर मोदी सरकारचं सेलिब्रेशन. 26 मे रोजी ओडिशातील कटकमध्ये मोदींची सभा. कटकमध्ये भाजपा जोरदार शक्तीप्रदर्शन करणार.

 • 11:08 AM

  सोलापूर- कृषी बाजार समितीतल्या कथित 39 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी सभापतींसह 20 संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

 • 11:06 AM

  कर्नाटक : एचडी कुमारस्वामींच्या शपथविधिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राहणार उपस्थित.

 • 10:00 AM

  पेट्रोल पुन्हा 30 पैशांनी महाग. मुंबईत पेट्रोलचा दर 84.70 रूपये. मोठ्या टीकेनंतरही सलग नवव्या दिवशी दरवाढ.

 • 09:33 AM

  नवी दिल्ली- हिंदू महासभेनं कर्नाटकातील एचडी कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयात दिले आव्हान

 • 09:04 AM

  हैदराबाद- तप्पचाबुत्रात रात्री भिंत कोसळून झालेल्या अपघातात एका सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू

 • 09:03 AM

  गुजरात : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीला मारहाण, पोलीस कर्मचाऱ्यानं कानशिलात लगावल्याचा आरोप. पोलीस कर्मचारी संजय अहीर अटकेत.

 • 08:31 AM

  ठाणे- घोडबंदर रोडवर कंटेनरला झालेल्या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी

 • 07:53 AM

  औरंगाबाद-जालना रोडवर सटाणा पाटीजवळ अपघात. अपघातात दोन जणांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी.

 • 07:37 AM

  पालघर पोटनिवडणूक : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजपा उमेदवाराचा प्रचार करणार.

 • 07:33 AM

  जम्मू काश्मीर : पाकिस्तानकडून अरनिया सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन.

प्रमोटेड बातम्या