शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मंचरमध्ये दोन गटांत हाणामारी; ५१ जणांवर गुन्हा

By admin | Updated: July 31, 2015 03:50 IST

येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या कारणावरुन दोन गटांत हाणामारीची घटना घडली. परस्पर विरोधी आलेल्या तक्रारीवरुन मंचर पोलिसात १५ जण व इतर ३६ जणांच्या विरोधात दंगलीचा

मंचर : येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या कारणावरुन दोन गटांत हाणामारीची घटना घडली. परस्पर विरोधी आलेल्या तक्रारीवरुन मंचर पोलिसात १५ जण व इतर ३६ जणांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंचर शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अकबरअली रियाजअली मीर यांनी फिर्याद दिली. दत्ता गांजाळे यांचा प्रचार करीत असल्याचा राग आल्याने बुधवारी रात्री ५ ते ६ जणांनी मीर यांना मारहाण केली. पोलिसांनी राजू इनामदार, कुमेल इनामदार, मन्सूर महंमद शेख, रा. मंचर, अशरफ नवाब शेख, खालीद नवाब शेख, शैबाज नवाब शेख, अरमान शेख, हसन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजू इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मीर उर्फ चिंटू, नाझा शब्बीरअली इनामदार हे माझ्या विरुदध अपप्रचार करीत होते. बुधवारी रात्री इनामदार व त्यांचे नातेवाईक घरी असताना गावातील ३० लोक आले व त्यांनी आमच्या वारसा हक्काबाबत वादाचे कारणावरुन व ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरुन शिवीगाळ करुन हातपाय तोडण्याची धमकी दिली़ आज पहाटे ते लोक परत आले व शिवीगाळ करत त्यांनी इनामदार यांचा मुलगा कुमेल याला हत्याराने मारहाण केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी इनामअली हसनअली इनामदार, गाजी अब्बास हसरतअली, नायब हसरतअली, दायम इनायतअली, अकबरअली रियाजअली, नाझा शब्बीर अली, शब्बीरअली कडूमियाँ व इतर ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परस्पर विरोधी आलेल्या तक्रारीवरुन दोन्ही बाजूकडील १५ जण व इतर ३६ अनोळखी व्यक्तींवर दंगलीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. (वार्ताहर)