शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

सॉरी पप्पा...! फेसबुक पोस्ट टाकत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पाेलिसांनी वाचविले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 20:23 IST

आपली मुलगी आत्महत्या करायला घराच्या बाहेर पडल्याचे समजल्यावर या वयाेवृद्ध दाम्पत्याला धक्काच बसला.

पुणे : मी आयुष्यात काही कमावले नाही. नोकरी नाही, सॉरी पप्पा, मला जगण्याचा काही अधिकार नाही, मी आत्महत्या करीत आहेत, अशी फेसबुकवर पोस्ट टाकून मोबाईल बंद करुन आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीचा महिला सहाय्य कक्षातील दामिनी पथकाने काही तासात शोध घेऊन तिचे समूपदेशन केले. आत्महत्येपासून या तरुणीला परावृत्त करुन आईवडिलांच्या स्वाधीन केले.
पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांना फेसबुकवर एका ३० वर्षाच्या तरुणीची फेसबुक पोस्ट आली होती. त्यात तिने आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते. त्यांनी ही बाब तातडीने महिला सहाय्य कक्षाला कळविली. सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे व महिला पोलीस शिपाई रासकर यांनी तिची माहिती घेतली तर तिने मोबाईल बंद केला होता.

तांत्रिक विश्लेषणावरुन दामिनी मार्शलांनी तिच्या घराचा पत्ता शोधून काढला. आईवडिलांकडे चौकशी केली तर त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती. ती नेहमीप्रमाणे बाहेर गेली होती. आपली मुलगी आत्महत्या करायला घराच्या बाहेर पडल्याचे समजल्यावर या वयाेवृद्ध दाम्पत्याला धक्काच बसला. मोबाईल बंद करण्यापूर्वी तिने कोणाकोणाला काॅल केला होता, याची माहिती पोलिसांनी काढली. त्यात एका मित्राची माहिती मिळाली. त्याला ती मोबाईल देण्यासाठी आली होती.

दामिनी पथकाने तातडीने परिसरात शोध घेतल्यावर कोथरुड येथे ती एका ठिकाणी बसलेली आढळून आली. पथकाने तिला कोथरुड पोलीस ठाण्यात आणले. तिच्याकडे आस्थेवाईकपणे चौकशी केली. नोकरी नसल्याने नैराश्य आले होते. आपल्याला लग्नाचा अधिकार नाही, असे वाटून आत्महत्या करीत असल्याचे पोस्ट फेसबुकला टाकली होती. सुजाता शानमे यांनी तिचे समुपदेशन केले. आईवडिलांना बोलावून तिला त्यांच्या स्वाधीन केले. आईवडिलांनी दामिनी पथकाचे आभार मानले. एका पोस्टमुळे आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीला वाचविण्यात पोलिसांना यश आले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसWomenमहिला